Join us

'वंदे भारत'मधून प्रवास करताय? मग, 'हे' पदार्थ प्रवासादरम्यान टाळा; रेल्वेचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 2:50 PM

Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेन ही देशातील अशी पहिली ट्रेन आहे, या ट्रेनला सात्विक (Sattvik) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. म्हणजेच आता ही ट्रेन पूर्णपणे हायजिनिक आणि शाकाहारी आहे.

नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्रेनमधील जेवणाबाबत रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. आता दिल्ली-कटरा वंदे भारत ट्रेनमध्ये नॉनव्हेज (Non veg) खाण्यास आणि नेण्यास मनाई करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन ही देशातील अशी पहिली ट्रेन आहे, या ट्रेनला सात्विक (Sattvik) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. म्हणजेच आता ही ट्रेन पूर्णपणे हायजिनिक आणि शाकाहारी आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेनेही (Indian Railway)याची सुरुवात केली आहे. ट्रेनमध्ये खानपान सुविधा पुरवणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and Tourism Corporation)आणि सात्विक कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात यापूर्वीच एक करार झाला आला आहे. दरम्यान, प्रवासी स्वतःसोबत नॉनव्हेज नेऊन प्रवासादरम्यान खाऊ शकत नाहीत.

आयआरसीटीसीने वंदेभारत ट्रेनला सात्विक ट्रेन बनवण्याची सुरूवात केली आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, टप्प्या-टप्प्याने धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या इतर ट्रेन्सला     सुद्धा सात्विक बनवले जाणार आहे. दरम्यान, या ट्रेन्समध्ये प्रवास करणारे प्रवासी असे असतात, जे धार्मिक यात्रेवर जातात आणि पूर्णपणे सात्विक खानपान पसंद करतात. यानंतर इतरही ट्रेन्स सात्विक बनवल्या जातील.

प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना ट्रेनमध्ये दिले जाणारे जेवण आवडत नाही, कारण त्यांना खात्री नसते की ट्रेनमध्ये मिळणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी आणि आरोग्यदायी आहे. जेवणाबाबत प्रवाशांच्या मनात शंका निर्माण होते. ट्रेनमध्ये जेवण बनवताना स्वच्छतेची किती काळजी घेतली गेली? व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळे शिजवले जाते का? जेवण बनवण्यापासून ते सर्व्ह करण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते? असे प्रश्न प्रवाशांच्या मनात येतोत. अशा प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आता भारतीय रेल्वेने सात्विक ट्रेन सुरू केली आहे.

सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच प्रमाणपत्र सात्विक कौन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक अभिषेक बिस्वास यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनला सात्विकचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्याअंतर्गत स्वयंपाक करण्याची पद्धत, स्वयंपाकघर, सर्व्ह करण्याची भांडी, देखभाल तपासण्यात आली, सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात आले. म्हणजेच रेल्वेने पूर्ण तयारी केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले आहे.

टॅग्स :वंदे भारत एक्सप्रेसभारतीय रेल्वे