Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्हॅट आॅडिटचा पतंग ९ फेब्रुवारीपूर्वी उडवा

व्हॅट आॅडिटचा पतंग ९ फेब्रुवारीपूर्वी उडवा

कृष्णा, मकरसंक्रांती सणामुळे उत्साह आहे.

By admin | Published: January 16, 2017 12:16 AM2017-01-16T00:16:43+5:302017-01-16T00:16:43+5:30

कृष्णा, मकरसंक्रांती सणामुळे उत्साह आहे.

VAT audit kites before February 9 | व्हॅट आॅडिटचा पतंग ९ फेब्रुवारीपूर्वी उडवा

व्हॅट आॅडिटचा पतंग ९ फेब्रुवारीपूर्वी उडवा

सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, मकरसंक्रांती सणामुळे उत्साह आहे. अनेक जण पतंग उडविण्यात मग्न होते व स्त्रिया वाण देण्याच्या तयारीत आहेत. विक्रीकर विभागाने व्हॅट आॅडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. या अनुषंगे व्हॅट करदात्याची पतंगबाजी कशी असेल?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जर व्हॅट व पतंगबाजी याला आपण जोडले तर पतंग उडविणारा म्हणजे व्यापारी, ‘पतंग’ म्हणजे व्हॅट रिटर्न, ‘चक्री’ म्हणजे हिशोबाची पुस्तके वा आॅडिट अधिकारी आणि ‘मांजा’ म्हणजे कायदा. व्हॅट आॅडिटर म्हणजे ‘गुंता’ सोडविणारा. मकरसंक्रांतीनिमित्त पतंगबाजीला अनुसरून व्हॅट आॅडिटच्या विविध तरतुदी समजू शकतो. व्हॅट आॅडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत १५ जानेवारी. परंतु विक्रीकर विभागाने जीएसटी नोंदणीकरण, व्हॅट रिटर्न, इ.मुळे २५ दिवसांची मुदतवाढ केल्याने करदाता ९ फेब्रुवारी २०१७पर्यंत रिपोर्ट दाखल करू शकतो.
अर्जुन : कृष्णा, व्हॅट आॅडिट कोणाला लागू होते?
कृष्ण : पतंगबाजीमध्ये ‘हवा’ असेल तर पतंग उडतो. तसेच व्यापारामध्ये वार्षिक उलाढाल किती आहे यावरून रिटर्न भरावे व व्हॅट आॅडिट करावे की नाही हे ठरते. आर्थिक वर्षाची उलाढाल १ कोटीपेक्षा जास्त असेल तर व्हॅट आॅडिट करून घेणे अनिवार्य आहे. आॅडिटमध्ये गुंता सोडवून नीट पतंग उडाली आहे की नाही हे पाहिले जाते. म्हणजेच रिटर्न बरोबर आहेत का नाही पुस्तकानुसार हे तपासले जाते. अनेकदा पुस्तके बरोबर न ठेवल्यामुळे करदात्याची चांगलीच गुंतागुंत होते.
अर्जुन : व्हॅट आॅडिट रिपोर्टमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती?
कृष्णा : पतंगबाजीमध्ये सर्वांत महत्त्वाची वस्तू म्हणजे ‘मांजा’. तसेच व्हॅट आॅडिटमध्ये महत्त्वाचे म्हणजे कायद्याचे पालन व त्यानुसार
आॅडिट रिपोर्ट अनेक्चर जे १ व जे २ आहे. जे १मध्ये करदात्याने
ज्याला विक्री केली आहे त्याचा टीन नंबर व वार्षिक एकूण विक्री व त्यावरील व्हॅट नमूद करावा लागतो. तसेच जे २मध्ये खरेदीदाराचे टीन नंबर व वार्षिक एकूण खरेदी व त्यावरील व्हॅट नमूद करावा लागतो. ही माहिती चुकीची गेली तर व्हॅट अधिकारी व्यापाऱ्याची ‘पेज’ घेऊन त्याला फरकावरती व्याज व दंड आकारतो. व्हॅट अधिकारी व्यापाऱ्याचा पतंग हिसकावून घेऊन जातो व
विक्री करणाऱ्याकडून सेटआॅफ न देता कर गोळा करतो. विभाग कॉम्प्युटराइजेशन वाढवत आहे. विभागाने ‘डिलर इनफॉर्मेशन सिस्टम’ नावाची सुविधा महाविकास वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये करदात्याला जे १ व जे २ यांमधील फरक समजतील. याचा अर्थ खरेदी-विक्रीची जुळवणूक अत्यंत महत्त्वाची आहे. यातच हवाला व बोगस खरेदी-विक्री उघडकीस येते. अनेक व्यापारी कायदा हातात घेतात व नंतर फसतात.
अर्जुन : करदात्याने व्हॅट आॅडिटसाठी काय काळजी घ्यावी?
कृष्ण : करदात्याने १) करदात्याचे व्हॅट आॅडिटसाठी दिलेले खरेदी-विक्रीची माहिती आॅडिटेड
ताळेबंद (बॅलेन्सशीट)नुसार
जुळवून द्यावी. जसे आपण पतंगबाजीमध्ये पतंगाची ‘कन्ना’ जुळवून बघतो. जर ती व्यवस्थित नसेल तर पतंग उडतच नाही. २) महाराष्ट्रातून खरेदी केलेल्या खरेदीवरच सेटआॅफ घ्यावा. सीएसटी डिक्लेरेशन फॉर्मस् म्हणजेच सी.एफ.एच. फॉर्मस् विक्रीच्या बिलाप्रमाणे व्यवस्थित नमूद करावेत. जसे हवा असेल तरच पतंग उडवता येतो नाहीतर तो बेहवा होऊन जातो किंवा ठुणक्या माराव्या लागतात. तसेच फॉर्मस् गोळा करण्यात हैराणी होते व न मिळाल्यास कर भरावा लागतो. तसेच व्हॅटमध्ये जर ही माहिती व्यवस्थित नसेल तर करदात्याला विभागाच्या वारंवार चकरा माराव्या लागतील किंवा अधिक कर व व्याज भरावे लागेल. ३) करदात्याने आर्थिक वर्षामध्ये भरलेल्या कराची माहिती, चलन, रिटर्न तयार ठेवावे. म्हणजेच पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पतंग, मांजा, चक्री असाव्यात; अन्यथा पतंग उडवण्यास अडचण येईल. तसेच व्हॅट आॅडिट करण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत; नाहीतर अडचण येते.
अर्जुन : कृष्णा, जर करदात्याने व्हॅट आॅडिट रिपोर्ट वेळेवर दाखल केले नाही, तर काय होईल?
कृष्ण : अर्जुना, व्हॅट आॅडिट
रिपोर्ट वेळेवर म्हणजेच ९ फेबु्रवारीच्या आधी दाखल केले नाही, तर
एकूण विक्री उलाढालीच्या १/१० टक्के इतका दंड लागू शकतो. म्हणजेच पतंग उडवताना (व्यापार करताना) जर हाताला बॅन्डेज लावले नाही (व्हॅड आॅडिट रिपोर्ट दाखल केले नाही) तर हात कापू शकतो (दंड लागू शकतो).
>अर्जुन : कृष्णा, जर करदात्याने मूळ (ओरिजनल) रीटर्न दाखल केले व त्यामध्ये आॅडिट केल्यानंतरच्या खरेदी-विक्रीमध्ये तफावत आढळल्यास काय करावे?
कृष्ण : अर्जुना, रीटर्न व आॅडिटमध्ये तफावत आढळल्यास करदाता रिव्हाईज रीटर्न कलम २० (४) (ए) अनुसार त्याच्या रीटर्न भरण्याच्या पिरीआॅडीटीनुसार करू शकतो. तसेच करदाता व्हॅट आॅडिट रिपोर्टमध्ये रीटर्न व आॅडिट रिपोर्ट यांतील फरक दाखवून कलम २० (४) (बी) अनुसार अ‍ॅन्यूअल रिव्हाईज रिटर्न दाखल करू शकतो.
>अर्जुन : कृष्णा, व्हॅट आॅडिट व मकरसंक्रांती यातून करदात्यांनी काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, जर करदात्यांनी कायदे योग्य रीतीने पाळले नाहीत तर त्यांच्यावर संक्रांत येऊ शकते. पतंग कटल्यावर जसे प्रतिस्पर्धी ओरडतो, ‘‘काटे, चल लपेट, दस्ता मार.’’ व्हॅट आॅडिट वेळेवर न केल्यास अधिकारी ओरडेल, ‘‘चला आता दंड भरा.’’ संक्रांतीची ‘कर’ लागू नये म्हणून वेळेवर ‘कर’ भरावेत.

Web Title: VAT audit kites before February 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.