Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाच स्टार्टअप्सनी घेतले व्हीसी अ‍ॅपचे आव्हान

पाच स्टार्टअप्सनी घेतले व्हीसी अ‍ॅपचे आव्हान

झूम अ‍ॅपला भारतीय पर्याय शोधण्याच्या सरकारच्या उद्देशाला आश्चर्यकारक प्रतिसाद लाभला असून ते आव्हान स्वीकारणाऱ्या पहिल्या पाच कंपन्या या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या यादीतील स्टार्टअप्स आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:00 AM2020-07-07T01:00:02+5:302020-07-07T01:00:47+5:30

झूम अ‍ॅपला भारतीय पर्याय शोधण्याच्या सरकारच्या उद्देशाला आश्चर्यकारक प्रतिसाद लाभला असून ते आव्हान स्वीकारणाऱ्या पहिल्या पाच कंपन्या या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या यादीतील स्टार्टअप्स आहेत.

VC App Challenged accpeted by Five Startups | पाच स्टार्टअप्सनी घेतले व्हीसी अ‍ॅपचे आव्हान

पाच स्टार्टअप्सनी घेतले व्हीसी अ‍ॅपचे आव्हान

नवी दिल्ली : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठीच्या झूम अ‍ॅपला भारतीय पर्याय शोधण्याच्या सरकारच्या उद्देशाला आश्चर्यकारक प्रतिसाद लाभला असून ते आव्हान स्वीकारणाऱ्या पहिल्या पाच कंपन्या या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या यादीतील स्टार्टअप्स आहेत.
या पाचपैकी पहिल्या टॉप तीन कंपन्या प्रत्येकी २० लाख अ‍ॅप्स तयार करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे देशी अ‍ॅप्लिकेशन पीपललिंक युनिफाईड कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद), सर्व वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड (जयपूर) आणि टेकजेनसिया सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (अलाप्पुझा) सरकारच्या पाठिंब्याने विकसित करतील. इतर दोन कंपन्या इन्ट्रिव्ह सॉफ्टलॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड (चेन्नई) आणि साऊलपेज आयटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) प्रत्येकी १५ लाख अ‍ॅपचे अंतिम उत्पादन विकसित करतील. गेल्या १३ एप्रिल रोजी हे आव्हान समोर ठेवले गेले होते. मूळ अमेरिकेचे असलेले झूम अ‍ॅप चांगलेच लोकप्रिय होते. 

Web Title: VC App Challenged accpeted by Five Startups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.