Join us

गुजरातला गेलेल्या वेदांतावर अगोदरच कर्जाचा डोंगर! त्यात राजकीय पक्षांना वाटली ४५७ कोटींची खैरात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 5:24 PM

कॅश डोनेशन स्वरुपात २००८ मध्ये इलेक्ट्रोरेल बॉन्ड स्कीम लाँच केली होती. यानंतर डोनेशन रुपात याचा वापर होऊ लागला.

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. आता वेदांता फॉक्सकॉन संदर्भात नवी माहिती समोर आली. वेदांता फॉक्सकॉन कंपनी अगोदरच आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे समोर आले होते. यातच आता एका अहवालातून एक मोठी माहिती समोर आली आहे. वेदांताने  देशातील राजकीय पक्षांना संभर दोनशे नाही तर ४५७ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. 

इनव्हेस्टमेंटचा बेस्ट ऑप्शन! बँक एफडीपेक्षाही चांगले रिटर्न देतायत 'या' सरकारी स्कीम

एका अहवालानुसार, अनिल अग्रवाल यांच्या कंपनी वेदांतने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये राजकीय पक्षांना १५५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दान केले आहेत. तर गेल्या ५ वर्षांत, या कंपनीने राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात ४५७ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या खुलाशात ही माहिती समोर आली आहे.

रोख देणगीला पर्याय म्हणून इलेक्टोरल बाँड योजना २००८ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून ते देणगीच्या स्वरूपात खूप वापरले. वेदांताने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या खुलाशानुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ६५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२० मध्ये ११४ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १२३ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १५५ कोटी रुपये राजकीय पक्षांना दान केले आहेत. या सर्व देणग्या इलेक्टोरल बाँडच्या स्वरूपात देण्यात आल्या आहेत.

वेदांत ग्रुपवर कर्ज किती 

वेदांता ग्रुपवर कर्जही तेवढ्याच प्रमाणात आहे. कंपनीला पुढील वर्षापर्यंत सुमारे १६,३५० कोटी रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. पुढील तीन वर्षांत कंपनीला सुमारे ३८,४२० कोटी रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. मात्र, अंबानी आणि अदानी यांच्यापासून धडा घेत वेदांताच्या प्रमुखांनी कर्जमुक्त होण्यासाठी  नियोजन सुरू केले आहे.

टॅग्स :वेदांता-फॉक्सकॉन डीलबँक