Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vedanta Foxconn Deal : फॉक्सकॉन गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत; वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितला कोणाचा 'हात'

Vedanta Foxconn Deal : फॉक्सकॉन गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत; वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितला कोणाचा 'हात'

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 03:58 PM2022-09-14T15:58:19+5:302022-09-14T15:59:53+5:30

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत.

Vedanta Foxconn Deal pm narendra Modi not behind Foxconn move to Gujarat Vedanta Chairman anil agarwal clarifies | Vedanta Foxconn Deal : फॉक्सकॉन गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत; वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितला कोणाचा 'हात'

Vedanta Foxconn Deal : फॉक्सकॉन गुजरातला नेण्यामागे मोदी नाहीत; वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितला कोणाचा 'हात'

वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजीगुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. परंतु आता यावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“सर्व राज्यांमध्ये आमचे लोक गेले. केपीएमजी, आमची फॉक्सकॉनचीही टीम गेली. त्यांनी गुजरातला पसंती दिली. कोणत्याही परिस्थितीत असं समजू नका की हे सर्व नरेंद्र मोदींनी केलं आहे. आमच्या इंडिपेंडंट एजन्सीनं असं ठरवलं की गुजरातच असं एक राज्य आहे ज्याने सिलिकॉन पॉलिसी सर्वात पहिले सुरू केली,” असं अग्रवाल म्हणाले.

‘तोडीस तोड प्रकल्प देणार’
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. 

एकनाथशिंदेकायम्हणाले?
शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Web Title: Vedanta Foxconn Deal pm narendra Modi not behind Foxconn move to Gujarat Vedanta Chairman anil agarwal clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.