Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vedanta-Foxconnनं सेमीकंडक्टर प्लांटसाठी नवा अर्ज केला दाखल, आता 'या' तंत्रज्ञानावर काम होणार

Vedanta-Foxconnनं सेमीकंडक्टर प्लांटसाठी नवा अर्ज केला दाखल, आता 'या' तंत्रज्ञानावर काम होणार

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज सादर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:03 PM2023-06-28T16:03:21+5:302023-06-28T16:03:43+5:30

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज सादर करण्यात आला आहे.

Vedanta Foxconn filed new application for semiconductor plant now working on another technology | Vedanta-Foxconnनं सेमीकंडक्टर प्लांटसाठी नवा अर्ज केला दाखल, आता 'या' तंत्रज्ञानावर काम होणार

Vedanta-Foxconnनं सेमीकंडक्टर प्लांटसाठी नवा अर्ज केला दाखल, आता 'या' तंत्रज्ञानावर काम होणार

एका दिवसापूर्वीच वेदांता आणि फॉक्सकॉन यांच्यात काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच फॉक्सकॉननं नवीन प्रकल्पासाठी नवा पार्टनर शोधण्यास सुरू केल्याचंही म्हटलं होतं. परंतु आता समोर आलेल्या बातमीनं या सर्व वृत्तांना पूर्णविराम दिला आहे. वेदांत-फॉक्सकॉन व्हेंचरनं ४०-नॅनोमीटर नोट तंत्रज्ञान अंतर्गत सरकारकडे नवीन सेमीकंडक्टर अर्ज दाखल केला आहे. यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये सारं काही आलबेल असल्याचं चित्र निर्माण होत आहे. वेदांतानं एका मीडिया रिपोर्टमध्ये अर्ज पुन्हा सादर केल्याची पुष्टी केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार अर्ज सादर करण्यात आला आहे. भारतात जागतिक दर्जाचे फॅब बनवण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नवा अर्ज
गेल्या वर्षी, वेदांतानं सुरुवातीला २८ एनएम नोडसाठी अर्ज केला होता. पण आता वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर जेव्ही ४० एनएम नोड्सचा पाठपुरावा करण्यात स्वारस्य दाखवत आहे. ४० एनएमपेक्षा अधिक मॅच्युअर नोड्सना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या धोरणाशी हे सुसंगत आहे. "काही लोक म्हणतात की तुमच्याकडे ३ एनएम नाही जो कोणत्याही मानवी डीएनएच्या आकाराइतका आहे. मी काल १.५ एनएम वर एक लेख पाहिला आणि तुम्हाला माहित आहे की ते साखरेच्या मॉलिक्युलइतकं आहे. आम्हाला ५५ एनएम, ९०एनएम, ६५ एनएमच्या चिप्स बनवण्याची गरज आहे," असं वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचे सीईओ डेव्हिड रीड यांनी यापूर्वी बिझनेस टुडेला सांगितलं.

वेदांताची यात ६७ टक्के भागीदारी
फॉक्सकॉन आपल्या सेमीकंडक्टर व्यवसायासाठी नवीन भागीदार शोधण्यासाठी मोठ्या भारतीय व्यावसायिकांची भेट घेत असल्याच्या वृत्तांदरम्यान ही नवी माहिती समोर आली आहे. सध्याच्या व्यवस्थेमध्ये, वेदांता ६७ टक्के भागीदारीसह जॉईंट व्हेन्चर लीड करत आहे. याआधी फॉक्सकॉनने पुढाकार घ्यावा अशी संबंधित मंत्रालयाची इच्छा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, वेदांतानं हे वृत्त फेटाळून लावलं आहेत. १ जून रोजी, भारताने सेमीकंडक्टर प्लांटसाठी अर्ज पुन्हा सुरू केले. नवीन अर्जदारांना स्वीकारणं आणि त्यांचं मूल्यांकन करणं सुरू केलं आहे. सरकारनं विद्यमान अर्जदारांना नव्याने अर्ज करण्यास आणि मॅच्युअर नोड्स फॉरवर्ड करण्यास सांगितलं आहे. 

Web Title: Vedanta Foxconn filed new application for semiconductor plant now working on another technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.