Vedanta Group News : देशातील दिग्गज व्यवसायिक समूह वेदांता देशात दोन नवे औद्योगिक पार्क उभारण्याच्या तयारीत आहे. या औद्योगिक पार्कमधून अॅल्युमिनियम, झिंक आणि चांदीचा पुरवठा केला जाईल. वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे ही माहिती दिली. अॅल्युमिनियम, जस्त आणि चांदीच्या पुरवठ्यासाठी हे इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच, दोन्ही पार्क नॉन प्रॉफिट आधारावर बांधली जाणार आहेत.
औद्योगिक पार्क उभारल्यानं कच्चा माल आणि रिन्यूएबल एनर्जीच्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. "ओद्योगिक क्लस्टर आर्थिक विकासाचं इंजिन आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील. सोबतच आसपास हजारो उद्योग निर्माण होतील. याशिवाय कंनपी इंधन, गॅस, लोह आणि पोलादासाठीही औद्योगिक पार्क उभारण्याच्या विचारात आहे. यामुळे आगामी काळात कच्च्या मालाच्या किंमतीत कपात होईल. यामुळे देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला चालना मिळेल. तसंच ऊर्जा क्षेत्रालाही चालना मिळेल," असं अनिल अग्रवाल म्हणाले.
शेअरमध्ये तेजी
यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. कामकाजाच्या अखेरिस कंपनीच्या शेअरमध्ये ०.३४ टक्क्यांची वाढ होऊन शेअर ४६५.५० रुपयांवर पोहोचला. मार्च २०२४ च्या २२५ रुपयांच्या नीचांकी पातळीवरुन शेअर आज ४६५ रुपयांवर पोहोचला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)