Lokmat Money > बिझनेस न्यूज > वेदांता लिमिटेड आपले 140000000 शेअर्स विकणार; 15% डिस्काउंटवर मिळेल हा स्टॉक...

वेदांता लिमिटेड आपले 140000000 शेअर्स विकणार; 15% डिस्काउंटवर मिळेल हा स्टॉक...

वेदांता लिमिटेडला आपला हिस्सा विकून 8000 कोटींहून अधिक रक्कम मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:05 PM2024-08-14T21:05:55+5:302024-08-14T21:07:00+5:30

वेदांता लिमिटेडला आपला हिस्सा विकून 8000 कोटींहून अधिक रक्कम मिळेल.

Vedanta Limited to sell its 140000000 shares; stock is available at 15% discount | वेदांता लिमिटेड आपले 140000000 शेअर्स विकणार; 15% डिस्काउंटवर मिळेल हा स्टॉक...

वेदांता लिमिटेड आपले 140000000 शेअर्स विकणार; 15% डिस्काउंटवर मिळेल हा स्टॉक...

Vedanta Ltd News : वेदांता लिमिटेडने (Vedanta Ltd) हिंदुस्थान झिंकमधील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत वेदांताने सांगितले की, ते झिंक व्यवसायातील 3.31% स्टेक, म्हणजेच 14 कोटी शेअर्स विकणार आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत हिंदुस्तान झिंकची फ्लोअर किंमत 486 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आज हा शेअर 573 रुपयांवर बंद झाला, म्हणजेच चालू किमतीवर 15% सूट मिळत आहे.

वेदांताला 8000 कोटींहून अधिक रक्कम मिळणार 
वेदांता लिमिटेडला हिंदुस्तान झिंकमधील आपला हिस्सा विकून 8000 कोटींहून अधिक रक्कम मिळणार आहे. विक्रीसाठी ही ऑफर 16 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 19 ऑगस्टपर्यंत खुली असेल. या डीलअंतर्गत बेस साईझ 1.22%, म्हणजेच 5.14 कोटी शेअर्सची असेल. याशिवाय 1.95%, म्हणजेच अतिरिक्त 8.23 ​​कोटी शेअर्स विकण्याचा पर्यायही असेल. ही ऑफर फॉर सेल बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 16 ऑगस्ट रोजी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 19 ऑगस्ट रोजी उघडेल.

हिंदुस्थान झिंकमध्ये वेदांताची 64.92% हिस्सेदारी 
दरम्यान, हिंदुस्थान झिंकमध्ये वेदांत लिमिटेडची 64.92% हिस्सेदारी आहे. दुसऱ्या फायलिंगमध्ये, कंपनीने म्हटले की, 20 ऑगस्ट रोजी बोर्डाची बैठक होणार आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील अंतरिम लाभांशाचा विचार केला जाईल. याला मान्यता मिळाल्यास 28 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Vedanta Limited to sell its 140000000 shares; stock is available at 15% discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.