नवी दिल्ली - भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांमधील जागरुकता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नवनवी पिके घेण्याकडे कल दिसून येत आहे. या सर्वांसोबत शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या अनेक महागड्या भाज्यांची शेती करण्यासही सुरुवात केली आहे. यामधील काही भाज्या ह्या सुमारे १२०० ते १३०० रुपयांपर्यंत विकल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना भरभक्कम नफा होतो.
तज्ज्ञ नेहमी शेतकऱ्यांना अशा पिकांची आणि भाज्यांची शेती करण्याचा सल्ला देतात, जी नेहमी बाजारामध्ये चांगल्या किमतीला विकली जातात. तसेच जे शेतकरी महागड्या भाज्यांचं पिक घेतात. ते प्रत्येकवर्षी बाजारातून लाखो रुपयांचा नफा घेतात.
शतावरीशतावरीची भाजी भारतातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी एक आहे. ती बाजारामध्ये सुमारे १२०० ते १५०० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. या भाजीच्या सेवनामुळे अनेक रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तिला परदेशातूनही मागणी असते. बोक चॉय बोक चॉय ही एक विदेशी भाजी आहे. तिची शेती भारतामध्ये खूप कमी प्रमाणात होते. मात्र आता येथेही शेतकऱ्यांनी या भाजीची शेती सुरू केली आहे. बाजारामध्ये या भाजीचा एक गड्डा ११५ रुपयांना विकला जातो. चेरी टोमॅटो तज्ज्ञांकडून नेहमीच चेरी टोमॅटोचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ही भाजी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. अशा परिस्थितीत बाजारामध्ये तिची किंमत ही सामान्य टोमॅटोंपेक्षा अधिक असते. सध्या हे टोमॅटो बाजारामध्ये सुमारे २५० ते ३५० रुपयांना विकले जातात. जुकिनी जुकिनी ही आरोग्य आणि चवीच्या दृष्टीने खूप चांगली मानली जाते. तिचे सेवन सामान्यपणे वजन घटवण्यासाठी केले जाते. अशा परिस्थितीत बाजारामध्ये तिची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बाजारामध्ये या भाजीची मागणी कायम असते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर ठरते.