Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाज्यांचे दर वाढले, महागाईचा भडका, घाऊक महागाई दर वाढून ०.७३ टक्क्यांवर

भाज्यांचे दर वाढले, महागाईचा भडका, घाऊक महागाई दर वाढून ०.७३ टक्क्यांवर

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सातत्याने शून्याच्या खाली होता. नोव्हेंबरमध्ये तो ०.२६ टक्के झाला होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 10:44 AM2024-01-16T10:44:41+5:302024-01-16T10:44:59+5:30

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सातत्याने शून्याच्या खाली होता. नोव्हेंबरमध्ये तो ०.२६ टक्के झाला होता. 

Vegetable prices rise, inflation flares, wholesale inflation rises to 0.73 percent | भाज्यांचे दर वाढले, महागाईचा भडका, घाऊक महागाई दर वाढून ०.७३ टक्क्यांवर

भाज्यांचे दर वाढले, महागाईचा भडका, घाऊक महागाई दर वाढून ०.७३ टक्क्यांवर

नवी दिल्ली : डिसेंबर २०२३ मध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ०.७३ टक्के झाला. खाद्य पदार्थ विशेषत: भाज्या व डाळींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईचा पारा वर चढला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सातत्याने शून्याच्या खाली होता. नोव्हेंबरमध्ये तो ०.२६ टक्के झाला होता. 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, विविध ग्राहोपयोगी वस्तू, कारखान्यांना लागणारी यंत्रे व उपकरणे, वाहने, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स व ऑप्टिकल उत्पादने यांच्या किमती वाढल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये महागाई वाढली. 

महागाई नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात दुमाही पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याज दर स्थिर ठेवले होते. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये खाद्य महागाई वाढेल, असे अनुमानही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले होते. 

Web Title: Vegetable prices rise, inflation flares, wholesale inflation rises to 0.73 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.