कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाच्या अडचणी सातत्यानं वाढत आहेत. लॉकडाऊनमुळे नोकर्यांवर संकट ओढवले आहे. दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील बर्याच ठिकाणी 20 ते 30 रुपयांना प्रतिकिलो विकल्या जाणा-या भाज्या आता 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. ब्रोकोलीसारख्या भाज्या 400 रुपये प्रतिकिलोनं विकल्या जात आहेत. व्यापा-यांना असा विश्वास आहे की, मुसळधार पावसामुळे आवक कमी झाली आहे. याव्यतिरिक्त मुसळधार पावसाने टोमॅटोसारख्या नाशवंत पिकांचेही नुकसान केले आहे. परंतु 10 सप्टेंबरनंतर भाजीपाल्याचे दर घसरण्यास सुरुवात होईल.भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे सर्व वर्गातील लोक त्रस्त आहेत. दिल्लीच्या मंडईमध्ये टोमॅटो 60 ते 80 रुपये किलो आणि बटाटे 40 रुपये किलो दराने विकले जात आहेत. गाझीपूर मंडईमध्ये धने 200 रुपये किलो आणि लसूण 150 रुपये किलोवर पोहोचले आहेत. दुसरीकडे मिरची प्रतिकिलो 100 ते 150 रुपयांना विकली जात आहे. वांगे, लेडीफिंगर आणि कांद्याच्या किमतीही लक्षणीय वाढल्या आहेत.10 सप्टेंबरनंतर भाजीपाला परवडेल - आशियातील सर्वात मोठी आझादपूर भाजी मंडईचे अध्यक्ष व व्यापारी राजेंद्र शर्मा म्हणतात, "शेतक-यांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सध्या परिस्थिती चांगली आहे. अनलॉकखाली देशात सूट मिळत असल्याने भाजीपाला बाजारात येऊ लागला आहे.दिल्लीत साप्ताहिक बाजार सुरू झाल्यामुळे भाजी विक्रेत्यांना फायदा होऊ लागला आहे. जर भाज्यांचे दर आकाशाला भिडत असतील तर मी सरकारला सांगू इच्छितो की, आपण दर निश्चित करावेत. पावसाळ्यात बर्याचदा भाजीपाल्याचा पुरवठा कमी होतो. यामुळे भाज्यांचे दर एकाच वेळी वाढतात, परंतु सप्टेंबर ते मार्च या काळात परिस्थिती सामान्य आहे. ही नवीन गोष्ट नाही, भाज्या 10 सप्टेंबरपासून स्वस्त होऊ लागतील.
...म्हणून सप्टेंबरमध्ये भाज्यांचे दर कमी होतील अन् सर्वसामान्यांना दिलासा मिळेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 2:46 PM