नवी दिल्ली : टोमॅटाचे दर वाढल्यामुळे जुलै महिन्यात घरात बनविण्यात येणारी शाकाहारी थाळी आदल्या महिन्याच्या तुलनेत ११ टक्के महाग झाली आहे. आदल्या वर्षाच्या तुलनेत मात्र ही थाळी ४ टक्के स्वस्त झाली आहे.
‘क्रिसिल’ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, अन्नधान्ये, डाळी, भाज्या, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमतीतील बदलाचा परिणाम थाळीच्या किमतीवर झाला आहे. थाळीच्या किमतीतील वाढीत सर्वाधिक ७ टक्के योगदान एकट्या टोमॅटोचे आहे. जूनमध्ये ४२ रुपये किलो असलेले टोमॅटो जुलैमध्ये ५५ टक्के वाढून ६६ रुपये किलो झाले.