नवी दिल्ली : मावळत्या वर्षातील डिसेंबरचा महिना वाहन क्षेत्रातील कंपन्यांसाठी फारसा चांगला राहिला नाही. चढे व्याज आणि मागणीत जोर नाही. तसेच उत्पादन शुल्क सवलत मागे घेण्यात आल्याने वाहन उद्योगाला त्याचा फटका बसणार आहे.
या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्या किमती वाढविण्याच्या विचारात असल्या तरी सद्य:स्थिती बघता वाहन कंपन्यांनी याबाबतीत ‘वेट अँड वॉच’चे धोरण स्वीकारले आहे. अशा स्थितीतही डिसेंबर २०१४ मध्ये मारूती सुझुकी, ह्युंदाई आणि टोयोटा या कंपन्यांच्या वाहन विक्रीत गेल्या वर्षातील याच अवधीच्या तुलनेत चांगली वाढ झाली.
डिसेंबर २०१४ मध्ये ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडच्या विक्रीत १४.७ टक्के वाढ झाली. या अवधीत ह्युंदाईच्या ३२,५०४ कार विकल्या गेल्या. जनरल मोटर्सच्या विक्रीत मात्र डिसेंबर २०१४ मध्ये ३६.५६ टक्के घट झाली. या महिन्यात जनरल मोटर्सच्या फक्त ३,६१९ कार विकल्या गेल्या. डिसेंबर २०१३ मध्ये ५,७०५ कार विकल्या गेल्या होत्या.
वाहन क्षेत्रातील महिंद्रा अँड महिंद्रालाही डिसेंबरमध्ये फटका बसला असून महिंद्राच्या एकूण विक्रीत ७ टक्के घट झाली. या महिन्यात महिंद्राच्या ३४,४६० कार विकल्या गेल्या. डिसेंबर २०१३ मध्ये या कंपनीची ३६,८८१ वाहने विकली गेली होती. तथापि, स्कॉर्पियो, एक्सयूव्ही-५००, बोलेरे आणि व्हेरिटोसह प्रवासी वाहनांची विक्री वाढली.
टोयोटा किर्लोस्कर मोटरची डिसेंबर २०१४ मध्ये ११,७४० वाहने विकली गेली. या अवधीत टोयोटाच्या विक्रीत १०.२५ टक्के वाढ झाली. डिसेंबर २०१३ मध्ये या कंपनीची १०,६४८ वाहने विकली गेली होती.
दुचाकी वाहन क्षेत्रातील हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत डिसेंबर २०१४ मध्ये ०.२१ टक्के एवढीच वाढ झाली. या अवधीत या कंपनीची ५,२६,०९७ दुचाकी वाहने विकली गेली.
तथापि, जानेवारी ते डिसेंबर या अवधीत ६६,४५,७८७ वाहनांची विक्री झाली.
टीव्हीएस मोटारचा जोर
डिसेंबर २०१४ मध्ये टीव्हीएस मोटारच्या एकूण विक्रीत २०.३ टक्के वाढ झाली असून या अवधीत या कंपनीची १,९१,८८० वाहनांची विक्री झाली. देशांतर्गत बाजारात या कंपनीच्या १,५७,४३८ दुचाकी विकल्या गेल्या. स्कूटर्सच्या विक्रीत २५.३३ टक्के, तर मोटारसायकलींच्या विक्रीत २१.९ टक्के वाढ झाली आहे.
४वाहन क्षेत्रात भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाच्या कार विक्रीत डिसेंबरमध्ये १३.३ टक्के वाढ झाली. डिसेंबर २०१४ मध्ये मारुतीच्या ९८,१०९ कार विकल्या गेल्या. मारुती कारच्या विक्री टॉप गिअरमध्ये झाल्याने मारुती सुझुकी इंडियाच्या शेअर्सचा भावही वधारला.
वाहन उद्योगांचे ‘वेट अँड वॉच’
मावळत्या वर्षातील डिसेंबरचा महिना वाहन क्षेत्रातील कंपन्यांसाठी फारसा चांगला राहिला नाही. चढे व्याज आणि मागणीत जोर नाही.
By admin | Published: January 2, 2015 12:01 AM2015-01-02T00:01:45+5:302015-01-02T00:01:45+5:30