Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाहनविक्री १६ वर्षांच्या नीचांकावर

वाहनविक्री १६ वर्षांच्या नीचांकावर

नोटाबंदीचा वाहनविक्रीला जोरदार फटका बसला आहे. डिसेंबरमध्ये वाहनांची विक्री तब्बल १८.६६ टक्क्यांनी घसरून १६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे

By admin | Published: January 11, 2017 12:49 AM2017-01-11T00:49:28+5:302017-01-11T00:49:28+5:30

नोटाबंदीचा वाहनविक्रीला जोरदार फटका बसला आहे. डिसेंबरमध्ये वाहनांची विक्री तब्बल १८.६६ टक्क्यांनी घसरून १६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे

Vehicle sales at 16-year low | वाहनविक्री १६ वर्षांच्या नीचांकावर

वाहनविक्री १६ वर्षांच्या नीचांकावर

नवी दिल्ली : नोटाबंदीचा वाहनविक्रीला जोरदार फटका बसला आहे. डिसेंबरमध्ये वाहनांची विक्री तब्बल १८.६६ टक्क्यांनी घसरून १६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. ‘सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
स्कुटर, मोटारसायकली, कार यांसारख्या सर्वच प्रमुख वाहन क्षेत्रांतील विक्रीवर नोटाबंदीचा परिणाम झाला आहे. डिसेंबरमध्ये १२,२१,९२९ कार विकल्या गेल्या. आदल्या वर्षी हा आकडा १५,0२,३१४ इतका होता. डिसेंबर २000 सालानंतरची ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. तेव्हा वाहनविक्री २१.८१ टक्क्यांनी घसरली होती. नोटाबंदी हेच विक्री घसरण्यामागील प्रमुख कारण असल्याचे सियामचे महासचिव विष्णू माथूर यांनी सांगितले. हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री वगळता सर्व वाहनांची विक्री घसरली आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री १.१५ टक्क्यांनी वाढून ३१,१७८ वाहनांवर गेली आहे, असे माथूर यांनी सांगितले.
माथूर यांनी सांगितले की, वाहनांच्या विक्रीतील घसरण तात्पुरती आहे. तथापि, विक्रीत वाढ कशी होते, हे अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येतात, यावर अवलंबून राहील
डिसेंबर २0१६ मध्ये देशांतर्गत कार विक्री १,५८,६१७ इतकी झाली. २0१५ मध्ये हा आकडा १,७२,६७१ इतका होता. याचाच अर्थ कारविक्रीत ८.१४ टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल २0१४ मधील १0.१५ टक्क्यांच्या घसरणीनंतरची ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. प्रवासी वाहनांची विक्री १.३६ घटून २,२७,८२४ वाहनांवर आली. आदल्या वर्षी हा आकडा २,३0,९५९ वाहने इतका होता.
दुचाकी वाहनांच्या विक्रीची नोंद सियामकडून १९९७ पासून ठेवण्यात येते. तेव्हापासूनच्या काळात सर्वांत मोठी घसरण डिसेंबरमध्ये झाली आहे. २२.0४ टक्क्यांनी घसलेली दुचाकींची विक्री ९,१0,२३५ गाड्यांवर आली. आदल्या वर्षी हा आकडा ११,६७,६२१ गाड्या इतका होता.

मर्सिडीज सलग दुसऱ्या वर्षी अव्वल
अल्पप्रमाणात विक्री घसरली असली तरी २0१६ मध्ये मर्सिडीज लक्झरी गाड्यांच्या क्षेत्रात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आली आहे. या वर्षात कंपनीने १३,२३१ गाड्या विकल्या. २0१५ मध्ये १३,५0२ गाड्या विकल्या गेल्या होत्या. २0१५ मधील आकडा कंपनी २0१६ मध्ये ओलांडू शकली असती. तथापि, जवळपास संपूर्ण वर्षात दिल्ली राजधानी क्षेत्रात २ हजार सीसी डिझेल वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी राहिली. त्यामुळे कंपनीला फटका बसला. डिसेंबर जानेवारीमधील विक्रीचा जोर पाहता कंपनी २0१७ मध्येही अशीच कामगिरी करील, असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Vehicle sales at 16-year low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.