Lokmat Money > बिझनेस न्यूज > सप्टेंबरात वाहनांच्या विक्रीमध्ये तब्बल २४ टक्के झाली घट; दुचाकी वाहनांनाही मागणी कमीच

सप्टेंबरात वाहनांच्या विक्रीमध्ये तब्बल २४ टक्के झाली घट; दुचाकी वाहनांनाही मागणी कमीच

सप्टेंबर महिन्यात वाहनांच्या विक्रीत २३.६९ टक्के घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:53 AM2019-10-12T00:53:53+5:302019-10-12T00:54:07+5:30

सप्टेंबर महिन्यात वाहनांच्या विक्रीत २३.६९ टक्के घट झाली आहे.

Vehicle sales decline 5% in September; Demand for two-wheelers is minimal | सप्टेंबरात वाहनांच्या विक्रीमध्ये तब्बल २४ टक्के झाली घट; दुचाकी वाहनांनाही मागणी कमीच

सप्टेंबरात वाहनांच्या विक्रीमध्ये तब्बल २४ टक्के झाली घट; दुचाकी वाहनांनाही मागणी कमीच

नवी दिल्ली : देशातील वाहन उद्योगापुढील संकट थांबायला तयार नाही. गेले ९ महिने वाहनांची खरेदी होत नसल्याने सर्व कंपन्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सणासुदीआधी सप्टेंबरात वाहनांची खरेदी वाढून उद्योगाला बरे दिवस येतील, हा अंदाजही खोटा ठरला. सप्टेंबर महिन्यात वाहनांच्या विक्रीत २३.६९ टक्के घट झाली आहे.
वाहन उद्योजकांच्या सोसायटी आॅफ इंडियन असोसिएशन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) संघटनेने ही माहिती दिलीे. त्यांच्या म्हणण्यानुसार गतवर्षी सप्टेंबरात देश-विदेशांत मिळून २ लाख ९३ हजार ६६0 वाहनांची विक्री झाली. यंदा सप्टेंबरमध्ये मात्र २ लाख २३ हजार ३१७ वाहनेच विकली गेली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २३.६९ टक्क्याने कमी आहे.
केवळ भारताबाबत बोलायचे तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १ लाख ९७ हजार १२४ वाहनांची विक्री झाली, तर यंदा केवळ १ लाख ३१ हजार २८१ वाहनांची देशामध्ये विक्री झाली आहे.

Web Title: Vehicle sales decline 5% in September; Demand for two-wheelers is minimal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन