नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे गतवर्षी भारतातील कार विक्रीत विक्रमी १९ टक्के घसरण झाली आहे. यंदाही कार विक्रीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सिआयम) च्या अहवालात म्हटले आहे. मंदीमुळे ग्राहकांनी मोठ्या किमतीच्या वस्तू घेण्यामध्ये हात आखडता घेतल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
मागील वर्षभरात आर्थिक मंदीचा मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे. २०१८ मध्ये प्रवासी कारची विक्री २२ लाख ४० हजार एवढी झाली होती. हा आकडा २०१९ मध्ये सुमारे १८ लाख १० हजारांपर्यंत खाली आला आहे. दुचाकी व ट्रकच्या विक्रीत झालेली घट ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती दर्शविते. मागील वर्षभरात दुचाकीच्या विक्रीमध्ये १४ टक्क्यांनी, तर ट्रकच्या विक्रीतही जवळपास तेवढीच घट झाली आहे. १९९७ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहन विक्रीत घट झाल्याचे ‘सिआम’ने स्पष्ट केले आहे. भारताचा आर्थिक विकासदर मार्च अखेरपर्यंत ५ टक्के राहण्याची शक्यता आहे. मागील ११ वर्षांतील सर्वांत कमी विकासदर असेल. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये हा दर ६.८ टक्के एवढा होता. हेही वाहन उद्योगासाठी मोठा अडथळा ठरत आहे. काही उत्पादकांनी खपाअभावी कार उत्पादन थांबविले. वाहन क्षेत्राची ही स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरील मोठी समस्या आहे. कारण, या क्षेत्राशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ३.५ कोटी कामगार जोडले गेले आहेत.
>एप्रिलपासून विक्री वाढण्याची शक्यता
एपिल २०२० पासून प्रदूषणाच्या कडक नियमांची अंमलबजावणी सुरू होईल. त्यानंतर वाहनविक्रीत ८ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचाही मागणीवर परिणाम होईल. अजून आमच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत; अन्यथा कार विक्रीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले असते, असे सीआयएमचे अध्यक्ष राजन वाधेरा यांनी सांगितले.
वाहनविक्रीमध्ये गतवर्षी विक्रमी घट
आर्थिक मंदीमुळे गतवर्षी भारतातील कार विक्रीत विक्रमी १९ टक्के घसरण झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 07:30 AM2020-01-13T07:30:26+5:302020-01-13T07:31:50+5:30
आर्थिक मंदीमुळे गतवर्षी भारतातील कार विक्रीत विक्रमी १९ टक्के घसरण झाली आहे.
Highlightsआर्थिक मंदीमुळे गतवर्षी भारतातील कार विक्रीत विक्रमी १९ टक्के घसरण झाली कार विक्रीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सिआयम) च्या अहवालात म्हटलेमागील वर्षभरात आर्थिक मंदीचा मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे.