नवी दिल्ली : वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली ठरली नाही. भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदैई, फोर्ड आणि महिंद्रा यासारख्या कंपन्यांच्या देशांतर्गत विक्रीत किरकोळ वाढ झाली, तर दुसरीकडे होंडा कार्स, टाटा मोटर्स आणि टोयोटोच्या विक्रीत घट झाली.
जानेवारी २०१६ मध्ये मारुती सुझुकी इंडियाच्या एकूण विक्रीत २.६ टक्के घट होत १ लाख, १३ हजार ६०६ कार विकल्या गेल्या. तथापि, देशांतर्गत विक्री ०.८ टक्के वाढली.
ह्युंदैई मोटार इंडिया लिमिटेडच्या देशांतर्गत विक्री ९.३ टक्के वाढली. जानेवारी २०१६ मध्ये ह्युंदैईच्या ३८,०१६ कार विकल्या गेल्या, तसेच महिंद्रा अँड महिंद्राच्या देशांतर्गत विक्रीतही ९.८४ टक्के वाढ झाली असून, या अवधीत महिंद्राची ४०,६९३ वाहने विकली गेली.
जर्मनीच्या फॉक्सवॅगन इंडियाच्या देशांतर्गत विक्रीतही ७.६ टक्के वाढ झाली. जानेवारीत २०१६ मध्ये फॉक्सवॅगनच्या ४,०१८ कार विकल्या गेल्या. फोर्ड कंपनीच्या वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत ५.९८ टक्के वाढ झाली असून, या अवधीत या कंपनीच्या ७,०४५ कार विकल्या गेल्या. दुसरीकडे, होंडा कार्सच्या देशांतर्गत विक्रीत ६.५२ टक्के घट झाली असून या अवधीत या कंपनीची १७,१३५ वाहने विकली गेली. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत १८ टक्के घट झाली. या अवधीत टाटा मोटर्सची १०,७२८ वाहने विकली गेली. जानेवारी २०१६ मध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटारच्या देशांतर्गत विक्रीत ३०.४९ टक्के घट होत या कंपनीची ८,७९३ वाहने विकली गेली.
वाहन विक्रीची गती सुस्तावली
वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली ठरली नाही. भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदैई, फोर्ड आणि महिंद्रा यासारख्या कंपन्यांच्या
By admin | Published: February 2, 2016 02:59 AM2016-02-02T02:59:01+5:302016-02-02T02:59:01+5:30