Lokmat Money > बिझनेस न्यूज > वरोरा बाजारपेठेने मोडला दहा वर्षांचा विक्रम

वरोरा बाजारपेठेने मोडला दहा वर्षांचा विक्रम

पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ म्हणून वरोरा तालुक्याची असलेली ओळख व तसे त्याचे गतवैभव त्याला यावर्षी लाभण्याचा योग आला आहे.

By admin | Published: February 19, 2015 01:45 AM2015-02-19T01:45:10+5:302015-02-19T01:45:10+5:30

पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ म्हणून वरोरा तालुक्याची असलेली ओळख व तसे त्याचे गतवैभव त्याला यावर्षी लाभण्याचा योग आला आहे.

The Vero market breaks the record of ten years | वरोरा बाजारपेठेने मोडला दहा वर्षांचा विक्रम

वरोरा बाजारपेठेने मोडला दहा वर्षांचा विक्रम

वरोरा : पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ म्हणून वरोरा तालुक्याची असलेली ओळख व तसे त्याचे गतवैभव त्याला यावर्षी लाभण्याचा योग आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात तालुक्यात सुरू झालेल्या चार जिनिंग फॅक्टऱ्यांमुळे यावर्षी येथे तब्बल तीन लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे. त्याआधी तालुक्यातील कापूस विक्रीसाठी अन्य जिल्ह्यांमध्ये घेऊन जावा लागत होता. पुढील एक महिन्यापर्यंत आणखी कापूस विक्रीसाठी येणार आहे. कापसाच्या या विक्रमी आवकामुळे तालुक्यातील कापूस खरेदीचा अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढला असून वरोराला कापसाच्या बाजारपेठेचा मान पुन्हा मिळाल्याचे मानले जात आहे.
वरोरा शहरात चार जिनिंग फॅक्टरी तर शेगाव, माढेळी येथेही जिनिंग फॅक्टरी होती. आधुनिकीकरणामुळे या जिनिंग फॅक्ट्ररी मागे पडत कालांतराने बंद पडल्या. अनेक फॅक्टरीमध्ये आता वसाहती झाल्या आहेत. जिनिंग नसल्याने वरोरा तालुक्यातील शेतकरी आपला कापूस वणी, हिंगणघाट येथे विक्रीसाठी नेत होते. त्यामुळे वरोरा परिसरातील बाजारपेठेवर त्याचा विपरित परिणाम झाला होता. सध्या माढेळी वरोरा येथे चार जिंिनंग उभे झाले आहेत. या जिनिंगमध्ये वरोरा तालुक्यासोबतच भद्रावती, चिमूर तसेच यवतमाळ व वर्धा जिल्ह्णातील कापूस विक्रीसाठी येत आहे.

च्शासनाने हमीभाव प्रति क्विंटल चार हजार ५० रुपये जाहीर करीत प्रत्येक ठिकाणी हमी भावाने शासकीय यंत्रणेमार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली. परंतु कापूस खरेदी अंतिम टप्प्यात आली असताना वरोरा तालुक्यात शासनाने अद्यापही कापूस खरेदी सुरु केली नाही, हे विशेष. शासन हमीभावाने कापूस खरेदी करेल, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला नव्हता. शासन कापूस खरेदी सुरु करणार नसल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी खासगीमध्ये कापूस विकणे सुरु केले आहे.

Web Title: The Vero market breaks the record of ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.