ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.
राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटाराहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.