Join us  

Vi चे २ जबरदस्त प्लॅन लाँच, १ रिचार्ज आणि वर्षभर टेन्शन फ्री; रोज २ जीबी डेटा, कॉलिंगही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 3:36 PM

Vi ने वर्षभराची वैधता असलेले दोन प्लॅन लाँच केले आहेत, ज्यामध्ये दररोज 2 GB डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसह अन्य जबरदस्त सुविधा उपलब्ध आहेत.

व्होडाफोन आयडियाने (Vi) ने दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. हा रिचार्ज प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसह येतो. या दोन्ही प्रीपेड प्लॅन्सची 2,999 आणि 2,899 रुपये आहेत. व्होडाफोन-आयडियाकडून एका वर्षाच्या प्रीपेड प्लॅन्सची सुविधा आधीपासूनच पुरवण्यात येत आहे. Vodafone-Idea च्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता आहे. तसेच, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि डेटा सुविधा उपलब्ध आहे.

Vi 2999 PlanVi च्या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 850 GB 4G डेटा देण्यात आला आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अनलिमिटेड नाईट डेटा ऑफर केला जात आहे, ज्याचा आनंद मध्यरात्री 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत घेता येईल.

Vi 2899 PlanVi च्या 2899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा दिला जात आहे. यासोबतच दररोज 100 एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. हा प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अनलिमिटेड नाईट डेटाची सुविधा उपलब्ध आहे. मध्यरात्री 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यूजर्स या मोफत डेटाचा आनंद घेऊ शकतील.

या दोन प्लॅन व्यतिरिक्त, एक वर्षाच्या दीर्घ वैधतेसह इतर प्लॅनदेखील Vodafone Idea द्वारे ऑफर केल्या जातात. यामध्ये 3099 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. या प्लॅनची ​​वैधता देखील 365 दिवसांची आहे. यामध्ये युजर्सना डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळते. फिफा विश्वचषकाच्या थेट स्ट्रीमिंगसाठी इंटरनेट रिचार्ज पॅक देखील Vi ने अलीकडेच लाँच केला आहे.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)