नवी दिल्ली : अलीकडेच, टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली होती आणि यादरम्यान कंपन्यांनी त्यांच्या सध्याच्या किंमती 250 रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या, परंतु आता व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) आपल्या ग्राहकांसाठी 4 नवीन प्लॅन जारी केले आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त प्लॅन 155 रुपयांचा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स आणि अनेक फायदे मिळत आहेत.
दरम्यान, हा प्लॅन केवळ 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना दिलासा देत 4 नवीन प्लॅन जारी केले आहेत, ज्यामध्ये 155 रुपये, 239 रुपये, 666 रुपये आणि 699 रुपयांचे प्लॅन आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया....
155 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनअंतर्गत, कंपनी आपल्या ग्राहकांना 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएसचा लाभ देत आहे. याशिवाय यूजर्सना या प्लॅन अंतर्गत 1 GB इंटरनेट डेटा देखील मिळत आहे. केवळ कॉलिंग युजर्ससाठी हा एक अतिशय चांगला आणि सर्वोत्तम प्लॅन आहे.
239 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
155 रुपयांव्यतिरिक्त, व्होडाफोन-आयडिया कंपनी 239 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर करत आहे. यामध्ये यूजर्संना 24 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याशिवाय, कंपनी या प्लॅन अंतर्गत युजर्संना 1 GB इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देते. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 100 एसएमएस दिले जातात.
666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅन अंतर्गत यूजर्सना जास्त दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. उदाहरणार्थ, 24 दिवसांऐवजी, युजर्संना 77 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅन अंतर्गत यूजर्सना 1.5 GB इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळते. याशिवाय Binge All Night, Data Delight Offer, Weekend Data Rollover सुविधाही उपलब्ध आहे.
699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे, परंतु या प्लॅन अंतर्गत यूजर्संना दररोज 3 GB इंटरनेट मिळते. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज मिळत आहेत. याचबरोबर, या प्लॅन अंतर्गत तुम्हाला Binge All Night, Data Delight Offer, Data Rollover, Vi Movies आणि TV चा मोफत एक्सेस मिळतो.