Join us

Vodafone-Idea च्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा, किंमत ९९ रूपयांपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 23:10 IST

Vi Prepaid Recharge plan : सध्या व्होडाफोन आयडिया ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे.

सध्या व्होडाफोनआयडिया (Vodafone-Idea) ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त अनेक रिचार्ज प्लॅन्स (Prepaid Recharge Offers) ऑफर करत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्वस्त प्लॅन्स आहेत ज्यामध्ये ग्राहकांना मोफक कॉलिंग आणि डेटाचाही लाभ देण्यात येतो. जर तुम्ही व्होडाफोनआयडियाचा स्वस्त आणि मस्त प्लॅन शोधत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. ९९ रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत येणाऱ्या या प्लॅन्समध्ये कंपनी ग्राहकांना मोफत कॉलिंग, डेटासह अतिरिक्त बेनिफिट्सही देत आहे.

९९ रूपयांचा प्लॅनव्होडाफोन आयडियाचा ९९ रूपयांचा प्लॅन १८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी २०० एमबी डेटा ऑफर करते. या प्लॅनची एक विशेष बाब म्हणजे यासोबत अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो. परंतु यात मोफत एसएमएसची सुविधा देण्यात येत नाही.

१०९ रूपयांचा प्लॅनकंपनीचा १०९ रूपयांचा प्लॅन हा २० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये इंटरनेट वापरण्यासाठी १ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये मोफत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. परंतु यासोबत एसएमएस सुविधा मात्र देण्यात येत नाही.

१२९ रूपयांचा प्लॅनया प्लॅनसोबत पूर्ण वैधतेसाठी ग्राहकांना १ जीबी डेटा ऑफर केला जातो. यामध्ये २४ दिवसांची वैधता देण्यात येत असून देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचं बेनिफिटही मिळतं. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३०० मोफत एसएमएसही देण्यात येतात.

१४९ रूपयांचा प्लॅनया प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात येते. तसंच कंपनी ग्राहकांना एकूण २ जीबी डेटा ऑफर करतेय या प्लॅनची विशेष बाब म्हणजे या प्लॅनसोबत ग्राहकांना अतिरिक्त १ जीबी डेटा मिळतो. यासाठी ग्राहकांना Vi च्या अॅपवरून रिचार्ज करणं अनिवार्य आहे. या मध्ये ३०० मोफत एसएमएस अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. यासह या प्लॅनमध्ये ग्राहकांना Vi Movies & TV अॅपचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळतं.

टॅग्स :व्होडाफोनआयडिया