सध्या दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. तर दुसरीकडे कंपन्या आपले ग्राहक टिकवण्याचाही प्रयत्न करत आहेत. अशातच व्होडाफोन-आयडियानं (Vi) आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. या अंतर्गत कंपनी ग्राहकांना लाँग टर्म प्लॅनवर ५० जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. हे प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसोबत येतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटाही देण्यात येतो.
ग्राहकांना २,५९५ रूपयांच्या प्रीपेड प्लॅनसोबत कंपनी अतिरिक्त ५० जीबी डेटा देत आहे. याव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एमएमएसचाही लाभ ग्राहकांना मिळतो. याव्यतिरिक्त या प्लॅन सोबत ग्राहकांना Zee5 आणि विकेंड रोलओवर डेटा बेनिफिट्सही मिळतात. यासोबतच Vi movies and TV चीदेखील मोफत सेवा देण्यात येते. ग्राहकांना Vi च्या वेबसाईटवर जाऊन आपला फोन क्रमांक एन्टर करून ही ऑफर पाहता येऊ शकते. यापूर्वीही Vi नं आपल्या ग्राहकांसाठी ५० जीबी अतिरिक्त डेटा दिला होता. गेल्या महिन्यात काही ठराविक ग्राहकांसाठी कंपनीनं १,४९९ रूपयांच्या प्लॅनसह ही ऑफर दिली होती. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांसाठी २४ जीबी डेटा आणि ३६०० एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा देण्यात येतो.
Vi चा २.३९९ रूपयांचादेखील लाँग टर्म प्लॅन आहे. यातही ग्राहकांना एका वर्षाची वैधता मिळते. याव्यतिरिक्त दररोज दीड जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह १०० एसएमएसदेखील देण्यात येतात. याव्यतिरिक्त MPL गेम खेळण्यााठी १२५ रूपयांचा कॅश बोनसही मिळतो. तर दुसरीकडे Zomato वरून ऑर्डर केल्यानंतर ग्राहकांना ७५ रूपयांची सूटही दिली जाते. या प्लॅनसोबत ग्राहकांना Vi Movies and TV चा अॅक्सेसही देण्यात येतो.
Vi देतंय ५० जीबी अतिरिक्त डेटा; पाहा कोणता आहे हा प्लॅन, कोणाला मिळणार बेनिफिट्स?
यासोबत ग्राहकांना आणखीही मिळणार बेनिफिट्स
By जयदीप दाभोळकर | Published: January 26, 2021 06:30 PM2021-01-26T18:30:44+5:302021-01-26T18:34:04+5:30
यासोबत ग्राहकांना आणखीही मिळणार बेनिफिट्स
HighlightsZee5 आणि विकेंड रोलओवर डेटा बेनिफिट्सही मिळणारकंपनीकडून आणखीही मिळणार भन्नाट ऑफर