राजरत्न सिरसाट अकोला
विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत गायींचे वाटप करण्यात आले. गायी वाटपात जिल्ह्यात झालेल्या घोटाळ््याची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यात काही नावे निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे.
विदर्भ विकास पॅकेजच्या गायी वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर या घोटाळ््याची चौकशी होण्यास सात वर्ष विलंब लागला. या संदर्भात लोकमतने २५ जानेवारीला वस्तुस्थिती मांडल्याने लाभधारक संस्थांचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने दिले होते. त्यानुसार दीड महिन्यापासून या गायी वाटप घोटाळाप्रकरणी चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन केंद्र शासनाने पंतप्रधान व राज्य शासनाने विशेष मुख्यमंत्री पॅकेज दिले होते. केंद्र आणि राज्य मिळून जवळपास चार हजार सातशे पन्नास कोटींचे हे पॅकेज होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह या पॅकेज अंतर्गत कृषिविकासाच्या योजना, शेतकऱ्यांना जोडधंद्यांबाबत विविध योजना राबविण्यात आल्या. विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हजार गायींचे पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले होते; पण अनेक ठिकाणी त्यांचे वाटप कागदोपत्रीच करू न शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे प्रकार निदर्शनास आले. अकोला जिल्ह्यातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना एक हजार गायींचे वाटप करण्यात आले आहे; परंतु यातील अनेक संंस्थांना गायी खरेदी केल्याचे कागदोपत्री भासवून या पॅकेजच्या अनुदानाच्या रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारी झाल्या. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व सहायक निबंधक सहकारी संस्था (पदूम), अकोला यांनी संयुक्तरीत्या चौकशी करू न शासनाला अहवाल दिला होता. या अहवालात मूर्तिजापूर तालुक्यात सहा संस्थांच्या माध्यमातून ४१ गायी खरेदी केल्या नसल्याचे चौकशीअंती आढळल्याचे नमूद केले आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या माध्यमातून २६ गायींची खरेदी झालीच नाही तर तेल्हारा तालुक्यातील एका संस्थेने नऊ गायी, तर आकोट तालुक्यातील एका संस्थेने पाच गायींची खरेदी कागदोपत्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती; पण या चौकशीनंतर हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. तथापि, लोकमतने या प्रकरणी वाचा फोडल्यानंतर विद्यमान राज्य सरकारने नव्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी पूर्ण झाली आहे.
गावागावात जाऊन फेर लेखापरीक्षण
गायी वाटप घोटाळ््याचा ‘लोकमत’ने पाठपुरावा करताच मार्च महिन्यात विधानसभेत लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न लावून धरला होता. त्यानुसार या सर्व संस्थांचे गावागावात जाऊन फेर लेखापरीक्षण अर्थात चौकशी करण्यात आली आहे.
विदर्भात गायी वाटपात झाला घोटाळा!
विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत गायींचे वाटप करण्यात आले. गायी वाटपात जिल्ह्यात झालेल्या घोटाळ््याची
By admin | Published: July 10, 2015 12:51 AM2015-07-10T00:51:00+5:302015-07-10T00:51:00+5:30