देशातील नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात. आपल्या ट्विटर हँडलवरुन ते नेहमीच चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असतात. अनेकदा ते काही भन्नाट व्हिडिओ शेअर करत जुगाडू व्यक्तींना ऑफरही देतात. तर, चांगले विचारही ते ट्विटरवरुन शेअर करतात, चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देत असतात. आता, आनंद महिंद्रांनी एका डोसावाल्या हॉटेलमधील वेटरचा व्हिडिओ शेअर केला आहे, तसेच, या व्हिडिओसोबत त्यांनी दिलेलं कॅप्शन भन्नाट आहे.
महिंद्रा यांनी गेल्याच आठवड्यात एका उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ शेअर केला होता. आता, त्यांनी एका हॉटेलमधील वेटरचा व्हिडिओ शेअर करत त्याच्या थाळी प्लेट उचलण्याच्या कलेचं कौतुक केलं आहे. वेटरचं कौशल्यही आपण ओळखायला हवं, तेही ऑलिंपिक स्पर्धेसारखं. या स्पर्धेत व्हिडिओतील हा युवक गोल्ड मेडल जिंकेल, असा विश्वास आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केला आहे.
We need to get ‘Waiter Productivity’ recognised as an Olympic sport. This gentleman would be a contender for Gold in that event… pic.twitter.com/2vVw7HCe8A
— anand mahindra (@anandmahindra) January 31, 2023
महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत हॉटेलमधील एका तव्यावर अनेक डोसे बनवण्यात आले होते. तेथील वेटर ह्या डोसा प्लेट एकावर एक.. एकावर एक... अशा उभारत तब्बल १६ प्लेट एकाचवेळी सर्व्ह करताना दिसून येतो. त्याचं हेच कौशल्य आनंद महिंद्राना भावलं असून त्यांनी व्हिडिओ लाईक केल्यामुळेच स्वत:च्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.
उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ केला होता शेअर
आनंद महिंद्रा यांनी गेल्याच आठवड्यात एका उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ शेअर केला होता. तुम्ही हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेकदा उडणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील. आता खऱ्या आयुष्यातही उडणाऱ्या गाड्या पाहायला मिळणार आहे.जपानी स्टार्टअप कंपनी AERWINS Technologies ने हवेत उडणारी बाईक (Flying Bike) लॉन्च केली आहे. XTURISMO नावाची जगातील ही पहिली फ्लांइग हॉवरबाईक डेट्रायट ऑटो शोमध्ये सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती.