Join us

VIDEO - टिवटिवाटासाठी आता शब्द कमी नाही पडणार

By admin | Published: September 20, 2016 4:21 PM

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्वीटरने मोठा बदल केला आहे. आता ट्वीटला अटॅच केलेले फोटो,Gif इमेज किंवा व्हिडीओ 140 कॅरेक्टरचा हिस्सा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.20 - मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने जास्त मजकूर टाकता येण्याची सोय देत मोठा बदल केला आहे. आता ट्विटसोबत जोडलेले फोटो,Gif इमेज किंवा व्हिडीओ 140 कॅरॅक्टरचा हिस्सा असणार नाहीत. त्यामुळे कॅरॅक्टर्सची संख्या 140च राहणार असली तरी प्रत्यक्षात मात्र, जास्त माहिती शेअर करता येणार आहे. यासंदर्भात कंपनीने मे महिन्यात कल्पना दिली होती. तर  19 सप्टेंबरपासून हा बदल प्रत्यक्षात अवतरला आहे. ट्विटरने ऑफिशिअल अकाउंटवर एक व्हिडीओ अपलोड करून याबाबत माहिती दिली आहे.  
ट्विटरवर कोणत्याही ट्विटसाठी 140 कॅरेक्टरची मर्यादा आहे. यामध्ये फोटो, Gif इमेज आणि व्हिडीओचाही समावेश होता. उदाहरण म्हणजे जर तुम्ही कोणत्या फोटोसह ट्विट करताना फोटो अटॅच असल्यास तुमच्याकडे 118 कॅरॅक्टरच बाकी राहायचे. सामान्यतः 22 कॅरॅक्टर फोटोसाठी वापरले जात होते मात्र आता फोटो,Gif इमेज किंवा व्हिडीओ 140 कॅरेक्टरचा हिस्सा असणार नाहीत. ज्यामुळे संपूर्ण 140 कॅरॅक्टर मजकुरासाठी वापरता येणार आहेत.