नवी दिल्ली : व्हिडिओकॉन टेलिकॉमने आयडिया सेल्यूलरला उत्तर प्रदेश (पश्चिम) आणि गुजरात सर्कलसाठी प्रत्येकी ५ एमएचझेड क्षमतेचे १८00 एमएचझेड बँडचे स्पेक्ट्रम विकले आहे. दोन्ही सर्कल मिळून ३३१0 कोटी रुपयांना हा सौदा झाला.
व्हिडिओकॉनला २0१३ च्या लिलावात उत्तर प्रदेश (पूर्व), उत्तर प्रदेश (पश्चिम), बिहार, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरियाणा या ६ सर्कलसाठी स्पेक्ट्रम वितरित झाले होते. यापैकी एमपीसीजी, हरियाणा आणि गुजरात या सर्कलमध्ये कंपनीने पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू केला. उत्तर प्रदेशातील दोन्ही सर्कल आणि बिहारात कंपनीचा व्यवसाय कमी असल्यामुळे कंपनी भागीदार शोधत होती.
२0१३ साली कंपनीला मिळालेले १८00 एमएचझेड बँडचे स्पेक्ट्रम लिबरलाईज्ड आणि कॉन्टिज्युअस या प्रकारातील आहेत. हे स्पेक्ट्रम ४ जी मोबाईल सेवेसाठी उपयुक्त समजले जाते. त्यामुळे मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांत त्याची मोठी मागणी आहे. कमी व्यवसाय असलेल्या पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपल्या मालकीचे स्पेक्ट्रम व्हिडिओकॉनला विकायचे आहे. त्याची किंमत जवळपास ३,५00 कोटी रुपये आहे. या दोन्ही सर्कलमध्ये देशातील एकूण लोकसंख्येपैकी २२ टक्के लोकसंख्या राहते. तसेच येथील टेलिडेन्सिटी अवघी ५९ टक्के आहे. त्यामुळे या भागात कंपन्यांना मोठी संधी
आहे.
व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे चेअरमन व्ही. एन. धूत यांनी सांगितले की, स्पेक्ट्रमच्या सौद्यात आम्हाला उत्तम भागीदार मिळाल्यामुळे आम्ही संतुष्ट आहोत. आमचा टेलिकॉम व्यवसाय मजबूत होण्यास त्यामुळे मदत होईल, याची आम्हाला खात्री आहे. स्पेक्ट्रम विक्रीच्या व्यवहारात जेएम फायनान्शिअल्स ही एकमेव आर्थिक सल्लागार कंपनी व्हिडिओकॉन टेलिकॉमसाठी काम करीत होती. (प्रतिनिधी)
व्हिडिओकॉनने विकले आयडियाला स्पेक्ट्रम
व्हिडिओकॉन टेलिकॉमने आयडिया सेल्यूलरला उत्तर प्रदेश (पश्चिम) आणि गुजरात सर्कलसाठी प्रत्येकी ५ एमएचझेड क्षमतेचे १८00 एमएचझेड बँडचे स्पेक्ट्रम विकले आहे
By admin | Published: November 25, 2015 11:27 PM2015-11-25T23:27:05+5:302015-11-25T23:27:05+5:30