नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया अभियानात योगदान देण्यासाठी व्हिडिओकॉन टेलिकॉमने आपल्या सर्व बिगर डाटा ग्राहकांना ७५0 एमबी नि:शुल्क डाटा सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बिगर डाटा ग्राहकांना डाटा सेवा वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही सवलत कंपनीने दिली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डाटा उपयोगाशी संबंधित माहिती देण्यासाठी कंपनीने एक नि:शुल्क हेल्पलाईनही सुरू केली आहे, तसेच आपल्या सर्व विशेष ब्रँडेड ‘व्हिडिओकॉन कनेक्ट’ आऊटलेटस्मध्ये प्रदर्शन केंद्रे स्थापन केली आहेत.
व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सचे संचालक आणि सीईओ अरविंद बाली यांनी सांगितले की, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी काही खास योजना सुरू करू इच्छित होतो. त्यानुसार, आम्ही ही सेवा सुरू केली आहे. कंपनी मध्यप्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश पूर्व आणि उत्तर प्रदेश पश्चिम, तसेच बिहार या सर्कलमध्ये सेवा पुरविते. मोफत डेटा सेवेचा प्लॅन देणारी व्हिडिओकॉन ही पहिलीच कंपनी ठरली आहे.
व्हिडिओकॉनची मोफत डाटा सेवा
पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया अभियानात योगदान देण्यासाठी व्हिडिओकॉन टेलिकॉमने आपल्या सर्व बिगर डाटा ग्राहकांना ७५0 एमबी नि:शुल्क डाटा सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
By admin | Published: July 6, 2015 10:54 PM2015-07-06T22:54:25+5:302015-07-06T22:54:25+5:30