''बिकिनी एअरलाईन्स'' म्हणून ओळखली जाणारी व्हिएतनामची स्वस्तातील एअरलाईन कंपनी 'Vietjet' यंदा डिसेंबरपासून भारतात विमानसेवा सुरू करणार आहे. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान थेट उड्डाणे होणार आहेत. महत्वाचे म्हणजे विश्वास बसणार नाही अशा किंमतीत म्हणजेच काही रुपयांत विमानाची तिकीटे मिळणार आहेत.
6 डिसेंबरला दर आठवड्याला सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दिल्लीवरून चार विमानउड्डाणे हो-ची-मीन सिटीसाठी होतील. तर हनोईवरून दिल्लीसाठी 7 डिसेंबरपासून विमान उड्डाणे सुरू होतील. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी तीन विमान उड्डाणे होणार आहेत.
या लाँचिंगसाठी एअरलाईन्सने एक योजना बनविली आहे. यामध्ये 'सुपर सेव्हिंग टिकीट'द्वारे पहिल्या तीन दिवसांमध्ये तिकीट बूक केल्यास केवळ 9 रुपये मोजावे लागणार आहेत. ही ऑफर 20 ते 22 ऑगस्टपर्यंतच असून आजचा शेवटचा दिवस आहे.
व्हिएतनामचे उपाध्यक्ष गुयेन थान सोन यांनी भारतासाठी पहिल्यांदाच विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आम्ही भारत आणि व्हिएतनाम दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यास जात आहोत. भारत आमच्यासाठी प्राथमिक आधारावर चांगली बाजारपेठ आहे. यामुळे भारताशी जोडणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. भारतीय प्रवाशांना आरामदायक प्रवास आणि वातावरणाचा चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यासाठी आम्ही अत्याधुनिक विमानांसह विश्वस्तरीय सेवा आणि व्हिएतनामच्या आदरातिथ्याचे निमंत्रण देत आहोत.