लंडन : बँकांकडून घेतलेली मुद्दलाची पूर्ण रक्कम परत करण्याची तयारी फरार विजय मल्ल्याने दर्शविली आहे. भारतात होणाऱ्या प्रत्यार्पणाला विरोध करतानाच, केवळ राजकारणी व प्रसारमाध्यमांनी आपल्याला घोटाळेबाज ठरविले, परंतु वस्तुस्थिती तशी नाही, असा दावा त्याने टिष्ट्वटरद्वारे केला आहे.
स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांच्या समूहाकडून मल्ल्याने किंगफिशर एअरलाइन्ससाठी ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न करता मल्ल्याने मार्च, २०१६ मध्ये भारतातून पळ काढला होता. त्यानंतर, केंद्र सरकारी तपास संस्थांनी त्याच्याविरुद्ध आंतरराष्टÑीय वॉरंट बजावले. लंडन पोलिसांनी त्याला अटकही केली होती, पण एप्रिल, २०१७ पासून मल्ल्या जामिनावर आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासंबंधीच्या याचिकेवर गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे. त्या आधीच मल्ल्याने चार टिष्ट्वट केले आहेत. ‘किंगफिशर एअरलाइन्सने सरकारला चांगला महसूल दिला, पण कच्चे तेल १४० डॉलर प्रति बॅरल या उच्चांकावर गेल्याने कंपनी तोट्यात गेली. यामुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही,’ असा दावा त्याने केला.
मुद्दल देण्याची विजय मल्ल्याने दाखविली तयारी
बँकांकडून घेतलेली मुद्दलाची पूर्ण रक्कम परत करण्याची तयारी फरार विजय मल्ल्याने दर्शविली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 04:13 AM2018-12-06T04:13:51+5:302018-12-06T04:14:04+5:30