नवी दिल्ली : भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या याच्या विरोधात ब्रिटिश न्यायालयात सुरू असलेल्या प्रत्यार्पण खटल्याशी संबंधित गोपनीय कायदेशीर दस्तावेज सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिले.
5 ऑक्टोबर रोजीच्या सुनावणीत सरकारने न्यायालयास सांगितले
होते की, ‘ब्रिटनमधील गोपनीय कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय मल्ल्या यांचे प्रत्यार्पण शक्य नाही.’ या पार्श्वभूमीवर न्या. यू. यू. ललित आणि न्या. अशोक
भूषण यांच्या पीठाने संबंधित
गोपनीय दस्तावेज सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. आपणास या प्रकरणातून मुक्त करण्याची विनंती मल्ल्या यांनी ॲड. ई. सी. अगरवाल यांच्यामार्फत केली होती. तीही न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
विजय मल्ल्या प्रत्यार्पण; अहवाल सादर करण्याचे आदेश
Vijay Mallya : 5 ऑक्टोबर रोजीच्या सुनावणीत सरकारने न्यायालयास सांगितले होते की, ‘ब्रिटनमधील गोपनीय कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय मल्ल्या यांचे प्रत्यार्पण शक्य नाही.’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 12:52 AM2020-11-03T00:52:35+5:302020-11-03T00:53:03+5:30