Join us

विजयपत सिंघानिया रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:30 AM

रेमंडचे संस्थापक डॉ. विजयपत सिंघानिया यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुंबई : रेमंडचे संस्थापक डॉ. विजयपत सिंघानिया यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच, त्यांचे पुत्र गौतम सिंघानिया हे घाईघाईने दिल्लीहून मुंबईला आहे. विजयपत सिंघानिया यांना हृदयविकार आहे.विजयपत सिंघानिया यांनी आठवडाभरापूर्वीच पुत्र गौतम सिंघानिया यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या मुलाने आपणास बेघर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असतानाच, त्यांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडल्याचे सांगण्यात आले. मुलाशी असलेल्या वादामुळे ते तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत होते.विजयपत सिंघानिया यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे आणि त्यांना वैद्यकीय देखभालीची तसेच तपासणीची गरज असल्याने त्यांना दाखल करण्यात आले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. सिंघानिया हे ७९ वर्र्षांचे असून, त्यांच्यावर या वर्षी मार्चमध्ये बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गुरुवारी दक्षिण मुंबई क्लबमध्ये गेले असताना तिथेच त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांना ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.