Lokmat Money > बिझनेस न्यूज > जबरदस्त! महिलेने २६५० रुपयात बनवली करोडोंची संपत्ती, रातोरात उघडलं नशीब

जबरदस्त! महिलेने २६५० रुपयात बनवली करोडोंची संपत्ती, रातोरात उघडलं नशीब

५६ वर्षाची महिला रातोरात करोडती झाल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:40 AM2023-08-16T09:40:36+5:302023-08-16T09:41:31+5:30

५६ वर्षाची महिला रातोरात करोडती झाल्याचे समोर आले आहे.

viral news woman wins a farmhouse worth 21 crore and 1 crore cash in a lottery | जबरदस्त! महिलेने २६५० रुपयात बनवली करोडोंची संपत्ती, रातोरात उघडलं नशीब

जबरदस्त! महिलेने २६५० रुपयात बनवली करोडोंची संपत्ती, रातोरात उघडलं नशीब

कोणाचं नशीब कधी चमकेल सांगता येत नाही. अनेकजण नशीबवान असतात. काहींच्या आयुष्याची सुरुवात गरिबीतून झालेली असते, पण अचानक धनलाभ होतो.लगेच श्रीमंत होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे लॉटरी. लॉटरीने अनेकांना कमी कालावधीत श्रीमंत बनवले आहे. अशीच घटना समोर आली आहे. इंग्लड येथील एक महिला रातोरात करोडपती झाल्याचे समोर आलं आहे. 

अरे व्वा! रिक्षाचालकाने अनोख्या पद्धतीने साजरा केला लेकीचा वाढदिवस; लोकांचं जिंकलं मन

या महिलेचे नाव एलिजा याहिओग्लु असं आहे. ही महिला इंग्लड येथील आहे. ५६ वर्षाच्या एलिजा या सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. त्या नेहमी लॉटरीत पैसे लावत होत्या. त्यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशीही लॉटरी काढली. त्यांनी २५ पाउंडचे म्हणजेच २६५० कोटी रुपयांची लॉटरी खरेदी केली. यात त्यांच नशीब चमकले. 

या लॉटरीत त्यांनी २ मिलियन पाउंड म्हणजेच तब्बल २१ कोटी रुपयांचे फार्महाऊस आणि एक रुपयांची रक्कम जिंकली. 

वाढदिवसा दिवशीच करोडो रुपये मिळाले

एलिजा यांचा ५६ वा वाढदिवस होता. याच दिवशी एलिजा करोडपती झाल्या आहेत. वाढदिवसा दिवशीच त्यांनी नेहमी प्रमाणे ओमेज मिलियन पाउंड ड्रा या लॉटरीचे तिकीट खरेदी केले.अचानक त्यांच्या पतिला एलिजाने लॉटरी जिंकल्याची माहिती मिळाली. 

एलिजाने जिंकलेले फार्महाऊस यॉर्कशायर जवळ आहे.  एलिजा या यॉर्कशायर येथील राहणाऱ्या आहेत. त्यांना त्याच शहरात फार्महाऊस मिळालं आहे.   

Web Title: viral news woman wins a farmhouse worth 21 crore and 1 crore cash in a lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.