केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालकांना पाणी देताना दिसत आहेत. खरं तर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंदुरू या कार्यक्रमादरम्यान भाषण देत होत्या. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या.
भाषणादरम्यान, चंदुरू यांनी कर्मचाऱ्याकडे पाणी मागितलं. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी पाणी दिले. व्हिडीओमध्ये अर्थमंत्री आपल्या आसनावरून उठून कार्यक्रमाला संबोधित करणाऱ्या पद्मजा चंदुरू यांना पाण्याचा ग्लास देताना दिसत आहेत. निर्मला सीतारामन यांनी त्या ठिकाणी उपस्थित लोकांची मने जिंकली आणि लोकांनी त्यांचं कौतुकही केलं. त्याचवेळी, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.
At an NSDL event: While giving a speech Smt. Padmaja MD, NSDL requests hotel staff for water.
— Rishi Bagree (@rishibagree) May 8, 2022
And guess what happened next pic.twitter.com/hmxJbiRINz
हा व्हिडीओ एनएसडीएलच्या सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रमाचा आहे. मुंबईत शनिवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हिंदी आणि अन्य स्थानिक भाषांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एनएसडीएलचा गुंतवणूक कार्यक्रमाचा सुभारंभ केला.