इंग्रजांनी भारतात आल्यानंतर अक्षरश: भारताची लूट केली. मोठ्या प्रमाणात त्यांनी लूटही केली. परंतु जवळपास ४०० वर्षांपूर्वी गुजरातमधील सुरत मध्ये एक व्यापारी होता, ज्याकडे त्यावेळी जगातील सर्वाधिक संपत्ती होती. असे इंग्रजांच्या रेकॉर्डवरूनच ही बाब समोर आलीये. वीरजी व्होरा असे त्यांचं नाव होतं. विकिपीडियानुसार, विरजी व्होरा यांची वैयक्तिक संपत्ती त्यावेळी २४,००० अब्ज डॉलर्स इतकी होती. त्यांचा व्यवसायही असा होता की त्यांना त्या काळी मर्चंट प्रिन्स असं म्हटलं जायचं. म्हणूनच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि डच ईस्ट इंडिया कंपनीनंही त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं.
काय होता त्यांचा व्यवसाय?
चार दशकांपूर्वीही गुजरातमधील सुरत हे मोठं व्यापारी केंद्र होतं. त्यावेळी व्यापारी विरजी व्होरा यांची काही वस्तूंच्या आयात-निर्यातीत एकप्रकारची मक्तेदारी होती. यामध्ये मसाले, सोने-चांदी, अफू, हस्तीदंत आदींचा समावेश होता. जगातील अनेक देशांतील व्यवसायामुळे त्याच वेळी पर्शियन आखात, आग्नेय आशियाई देशांसह काही ठिकाणी त्यांनी आपलं कार्यालय उघडलं.
मर्चंट प्रिन्स संबोधलं जायचं?
वीरजी व्होरा यांना इंग्रज 'मर्चंट प्रिन्स' असं संबोधत असत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्याकडून भारतीय मसाले विकत घेत असे. अधूनमधून कंपनी त्यांच्याकडून पैसेही उधार घेतले जायचे. व्यवसायात त्यांची इतकी पकड होती की, दख्खनमधील आग्रा, बुऱ्हाणपूर, गोलकुंडा, पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, मलबारमधील कालिकत आणि बिहार शीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते. गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा आणि भरुचच्या कानाकोपऱ्यात त्याचे एजंट तैनात होते.