Vodafone-Idea जरी युझर्सच्या बाबतीत Reliance Jio, Airtel च्या मागे असलं तरी कंपनी अनेक चांगले प्लॅन्स ऑफर करत आहे. कंपनीकडे काही असेही प्लॅन्स आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या प्लॅन्सपुढे रिलायन्स जिओचेही प्लॅन्स फिके पडल्याचं दिसून येत आहे. आपण व्होडाफोनआयडियाच्या अशा प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ ज्यात ग्राहकांना दररोज 3GB डेटा देण्यात येतो. याशिवाय या प्लॅन्समध्ये अनेक जबरदस्त बेनिफिट्सही मिळत आहेत.
व्होडाफोनआयडियाच्या 901 रूपयांच्या प्लॅनमध्ये 3GB डेटा देण्यात येतो. त्याशिवाय यामध्ये 48GB अतिरिक्त डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. याप्रमाणे या प्लॅनमध्ये एकूण 300GB डेटा देण्यात येत आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभही ग्राहकांना देण्यात येत आहे.
व्होडाफोन-आयडिया या प्लॅनसह ग्राहकांना एका वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शनही मोफत देत आहे. याशिवाय कंपनी रात्री 12 ते सकाळी 6 या कालावधीत फ्री डेटा, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV VIP च्या अॅक्सेससारख्या सुविधाही देत आहे.
रिलायन्स जिओचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या अशा प्रकारच्या सुविधांसाठी ग्राहकांना 999 रूपयांचा प्लॅन खरेदी करावा लागतो. यामध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता आणि एकूण 250GB डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही देण्यात येतो. याशिवाय ग्राहकांना JioTV, JioCinema, Jionews, JioSecurity, JioCloud यासारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
जिओच्या तुलनेत व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये 48GB अतिरिक्त डेटा, रात्री मोफत डेचा आणि विकेंड डेटा रोल ओव्हरसारख्या सुविधागी देण्यात येतात. याशिवाय कंपनी एका वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile चं देखील सबस्क्रिप्शन देते.