Join us  

चेंबरच्या अध्यक्षपदी विश्वनाथ करवा

By admin | Published: September 04, 2015 10:46 PM

सोलापूर : चेंबर ऑफ कॉर्मसच्या अध्यक्षपदी सूत व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ करवा यांची बिनविरोध निवड करण्यात आली़

सोलापूर : चेंबर ऑफ कॉर्मसच्या अध्यक्षपदी सूत व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ करवा यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
व्यक्तिगत कारणावरुन मावळते अध्यक्ष सिद्धेश्वर बमनी यांनी चेंबर ऑफ कॉर्मसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता़ गुरुवारी झालेल्या चेंबर ऑफ कॉर्मसच्या बैठकीत बमनी यांनीच करवा यांचे नाव सुचविल़े उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्यांनी पाठिंबा दिला़ निवड होताच करवा यांचा चेंबरच्या वतीने सत्कार करण्यात आला़
या बैठकीत एलबीटी हटविल्याबद्दल राज्य शासनाच्या अभिनंदनाचा आणि सोलापूरचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याबद्दल पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा़ शरद बनसोडे, आमदार सुभाष देशमुख, महापौर सुशीला आबुटे यांच्या अभिनंदनाचा ठरावा यावेळी मांडण्यात आला़ यावेळी कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष के दार होनराव, पॉवरलूम डेव्हलपमेंटचे राजू राठी यांचाही सत्कार करण्यात आला़
चेंबरचे मानद सचिव धवल शहा, सरचिटणीस राजगोपाल झंवर, उपाध्यक्ष नीलेश पटेल, बसवराज दुलंगे, पशुपती माशाळ, प्रकाश वाले, चेतन बाफना, बसवराज कुलकर्णी, यल्लप्पा यलदी, पेंटप्पा गड्डम, रमेश राठी, ओम डागा, शिवकुमार चंकेश्वरा, विजय उपाध्ये आदी उपस्थित होत़े (प्रतिनिधी)
नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करु: करवा
पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांपुढे प्रतिक्रिया नोंदवत असताना नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही दिली़ एलबीटी हटली, आता जीएसटी लागू होईल़ या गोष्टी उद्योग, व्यवसायाला पूरक आहेत़ उद्योग व्यापाराचे जाळे मोठे आह़े एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सोलापुरातच व्हाव़े शिवाय कुंभारी परिसरात नवी एमआयडीसी विकसित करण्यासाठी पाठपुरावा क रु असेही करवा म्हणाल़े