Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका दिवसात अचानकच 9330% वधारला हा शेअर, आता 99%नी घसरला, आला ₹1 वर; नेमकं काय घडलं? 

एका दिवसात अचानकच 9330% वधारला हा शेअर, आता 99%नी घसरला, आला ₹1 वर; नेमकं काय घडलं? 

गेल्या 14 ऑगस्टला एका शेअरने एकाच दिवसात 9330 टक्क्यांची उसळी घेत सर्वांनाच चकित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 04:33 PM2023-09-03T16:33:34+5:302023-09-03T16:33:50+5:30

गेल्या 14 ऑगस्टला एका शेअरने एकाच दिवसात 9330 टक्क्यांची उसळी घेत सर्वांनाच चकित केले.

Vision corporation stock which suddenly rose 9330percent in one day, has now fallen 99percent to rs1 | एका दिवसात अचानकच 9330% वधारला हा शेअर, आता 99%नी घसरला, आला ₹1 वर; नेमकं काय घडलं? 

एका दिवसात अचानकच 9330% वधारला हा शेअर, आता 99%नी घसरला, आला ₹1 वर; नेमकं काय घडलं? 

शेअर बाजारात ट्रेडिंगदरम्यान शेअर्समध्ये नेहमीच चढ-उतार बघायला मिळतो. एका मर्यादेनंतर या चढ-उतारावर ब्रेक लागतो. याला शेअर बाजाराच्या भाषेत अप्पल अथवा लोअर सर्किट म्हटले जाते. मात्र, गेल्या 14 ऑगस्टला एका शेअरने एकाच दिवसात 9330 टक्क्यांची उसळी घेत सर्वांनाच चकित केले. बीएसई इंडेक्सवर लिस्टेड या शेअरचे नाव आहे व्हिजन कॉर्पोरेशन.

काय आहे संपूर्ण प्रकरण -
मनीकंट्रोलने दिलेल्या एका वृत्तानुसार, एक दिवस आधी 1.58 रुपयांवर बंद होणारा व्हिजन कॉर्पोरेशनचा शेअर 14 ऑगस्टच्या सुरुवातीलाच ट्रेडिंगमध्ये 149.15 रुपयांवर पोहोचला. हे एकाच दिवसात 9330 टक्के परतावा दर्शवते. हा शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक देखील होता. ट्रेडिंग दरम्यानच हा शेअर 1.58 रुपयांपर्यंत कोसळळा आणि याची क्लोजिंग प्राइस देखील हीच राहिली. हा शेअरची खरेदी-विक्री करणाऱ्यांची ओळख पटू शकलेली नाही.

तज्ज्ञांनाही धक्का -
व्हिजन कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये घडलेल्या या घटनेमुळे ब्रोकर्सना देखील धक्का बसला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर ब्रोकर्सनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, हा एक समायोजन व्यापार असल्याचे दिसते. याचा संबंध एका अशा व्यवहाराशी आहे, ज्यात सिस्टिममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच खरेदी आणि विक्री करणाऱ्या पक्षांमध्ये चर्चा झाली होती. जर या दोन्ही पक्षांपैकी कुणीही एक्सचेन्जसोबत संपर्क साधला नसेल, तर याचा अर्थ, हा सौदा जानून-बुजून करण्यात आला होता, असा होऊ शकतो.

तसेच ब्रोकर्सकडून अंदाज लावला जात आहे की, हा सौदा होताना सर्किट फिल्टर काम करत नसेल. अशीही शक्यता आहे की, इंट्रा-डे सीमा बदलली जात असताना सिस्टिममध्ये काही गडबड झाली असेल. मात्र, बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज अर्थात बीएसईने यासंदर्भात कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. महत्वाचे म्हणजे, व्हिजन कॉर्पोरेशन एक पेनी मायक्रो-कॅप स्टॉक आहे.

Web Title: Vision corporation stock which suddenly rose 9330percent in one day, has now fallen 99percent to rs1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.