औरंगाबाद : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर येथील रूद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचे चेअरमन विवेक देशपांडे यांची केंद्र सरकारने फेरनियुक्ती केली. या ट्रस्टवर निवड झालेले मराठवाड्यातील ते एकमेव असून सलग तिसऱ्यांदा त्यांची निवड झाली आहे. पहिली निवड सहा महिन्यांसाठी, तर दुसरी दोन वर्षांसाठी होती. या काळात सहा हजार कोटींची कामे मार्गी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जपान दौऱ्यात मराठवाड्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व देशपांडे यांनी केले होते. या ट्रस्टवर देशपांडे यांच्याशिवाय शिपिंग मंत्रालयाचे संयुक्त सचिव बरून मित्रा, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल विशेष सचिव शशी शेखर, उरण येथील महेश रतन बाल्डी, मुंबईचे प्रमोद जठार, नागपूरचे राजेश बागडी आदींचा समावेश आहे.
विवेक देशपांडे यांची जेएनपीटीवर फेरनियुक्ती
By admin | Published: May 15, 2017 12:28 AM