Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vivoनं आणला सेल्फी एक्सपर्ट स्मार्टफोन

Vivoनं आणला सेल्फी एक्सपर्ट स्मार्टफोन

Vivoच्या नव्या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली असून, या स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्टवरही खरेदी करू शकता.

By admin | Published: May 7, 2017 09:55 PM2017-05-07T21:55:07+5:302017-05-07T21:55:07+5:30

Vivoच्या नव्या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली असून, या स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्टवरही खरेदी करू शकता.

Vivo Noa Shelley Expert Smartphone | Vivoनं आणला सेल्फी एक्सपर्ट स्मार्टफोन

Vivoनं आणला सेल्फी एक्सपर्ट स्मार्टफोन

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 -  Vivoच्या नव्या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली असून, या स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्टवरही खरेदी करू शकता. V5च्या या अपडेटेड व्हर्जनचा स्मार्टफोन गेल्या महिन्याच्या 27 तारखेलाच लाँच करण्यात आला होता. कंपनीनं याची किंमत 18,990 रुपये ठरवली आहे. ग्राहक या स्मार्टफोनला मॅट ब्लॅक आणि क्राऊन गोल्ड व्हेरिएंटमध्येही खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनला जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. V5 स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश लाइटसह 20 मेगापिक्सलचा मून लाइट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमे-याचं वैशिष्ट्य म्हणजे तो लो लाइटमध्येही चांगले फोटो खेचू शकतो. तसेच ड्युअल लेडचा 13 मेगापिक्सलचा बॅक कॅमेराही बसवण्यात आला आहे.

मेटलची बॉडी असलेल्या  Vivo V5s मध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले लावण्यात आला आहे. त्याप्रमाणेच स्मार्टफोन जलद गतीनं चालण्यासाठी 4 जीबी रॅम आणि 1.5GHz स्पीडची ऑक्टा कोर MediaTek MT6750 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा इंटरनल स्टोरेज 64 जीबीचा आहे. त्याला मेमरी कार्डच्या सहाय्यानं 265 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ग्राहक ब्लॅक कलरच्या पर्यायातही हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. त्याचा क्राऊन गोल्ड कलर व्हेरिएंट 20 मे रोजी खरेदी केला जाईल.

या स्मार्टफोनमध्ये अँड्राइड 6.0 मार्शमॅलो बेस्ड Funtouch OS 3.0 सिस्टीम देण्यात आलं आहे. तसेच त्याला VoLTE , Bluetooth v4.0, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, Micro-USB with OTG, GPS/ A-GPS आणि एक 3.5mm हेडफोन जॅकची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. ड्युअल सिमच्या सपोर्टवाल्या या स्मार्टफोनमध्ये 3000mAh इनबिल्ड बॅटरीही देण्यात आली आहे. 
 

Web Title: Vivo Noa Shelley Expert Smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.