नवी दिल्ली : वोडाफोन आणि केयर्नसोबतची प्रकरणे न्यायालयाबाहेर मिटविण्याची सरकारची तयारी आहे, असे वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. वोडाफोनशी संबंधित प्रकरणासंदर्भात आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे वोडाफोनमधील मित्र आणि सहकाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत. चर्चेतून वाद मिटविणे शक्य असेल तर आम्ही चर्चेस तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.
पूर्वलक्षी प्रभावाने कर लागू केल्याने २० हजार कोटी रुपयांचा कर चुकता करण्यास वोडाफोनला सांगण्यात आले आहे. सीबीडीटीच्या चेअरमन अनिता कपूर यांनी सांगितले की, कायदेशीर वाद कमी करण्याचा सरकारचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. वोडाफोन या वादात सरकारलाही मध्यस्थता प्रक्रियेत खेचले आहे. केयर्न एनर्जीनेही असेच केले आहे. कायदेशीर वाद कमी करण्यासाठी सवलती मागे घेणे आणि कंपनी कर दरात कपात करणे, या मार्गाने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. त्यासोबतच करसंहिता सुलभ केली जात आहे. या माध्यमातून आम्ही कायदेशीर वाद संपुष्टात आणण्यासाठी भरकस प्रयत्न करीत आहोत.
‘वोडाफोन’प्रकरणी तडजोड करणार’
वोडाफोन आणि केयर्नसोबतची प्रकरणे न्यायालयाबाहेर मिटविण्याची सरकारची तयारी आहे, असे वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले. वोडाफोनशी संबंधित प्रकरणासंदर्भात
By admin | Published: November 7, 2015 02:46 AM2015-11-07T02:46:33+5:302015-11-07T02:46:33+5:30