Join us

Vodafone-Idea ची प्रत्येक युझरमागे कमाई वाढली, नुकसानही पूर्वीपेक्षा झालं कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 8:26 PM

Vodafone Idea News :  व्होडाफोन आयडियाच्या परफॉर्मन्समध्ये सप्टेंबर तिमाहित सुधारणा पाहायला मिळाली आहे.

व्होडाफोनआयडियाच्या परफॉर्मन्समध्ये (Vodafone Idea Performance) सप्टेंबर तिमाहित सुधारणा पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहित व्होडाफोन आयडिचा नेट लॉस कमी झाला आहे आणि तो ७,१४४.६ कोटी रूपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित कंपनीला ७,३१२.९ कोटी रूपयांचं तोटा झाला होता. दुसऱ्या तिमाहित कंपनीला ग्राहकांकडून होणारी कमाई वाढली आहे. सप्टेंबर तिमहिमध्ये ती १०९ रूपयांवर पोहोचली आहे.

चालू आर्थिक वर्षात गेल्या तिमाहिच्या तुलनेत व्होडाफोन आयडिचा महसूलदेखील वाढला आहे. या तिमाहित कंपनीला ९,४०६.४ कोटी रूपयांचा महसूल मिळाला, जो यापूर्वीच्या तिमाहित ९,१५२.३ कोटी रूपये होता. एका वर्षापूर्वी याच कालावधीत कंपनीला मिळालेला महसूल १०,७८६ कोटी रूपये होता.ॉ

१०९ रूपये झाला आरपूचालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहिमध्ये व्होडाफोन आयडियाचा एवरेज रेव्हेन्यू पर युझर (ARPU) वाढून १०९ रूपये झाला आहे. गेल्या तिमाहित तो १०४ रूपये होता. जुलै सप्टेंबर या तिमाहित एअरटेल (Airtel) आणि रिलायन्स जिओ (Reliance JIO) चा एवरेज पर युझर रेव्हेन्यू अनुक्रमे १५३ रूपये आणि १४३.६० रूपये होता. व्होडाफोन आयडियाला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहिमध्ये २४ लाख ग्राहक गमवावे लागले. कंपनीकडे सध्या २५.३ कोटी ग्राहक आहेत. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी व्होडाफोन आयडियाचा शेअर ४.६६ टक्क्यांच्या वाढीसह १०.३४ रूपयांवर बंद झाला.

टॅग्स :व्होडाफोनआयडियाशेअर बाजार