Join us

Vodafone-Idea ग्राहकांना देत आहे स्मार्टफोन, लॅपटॉप, बाईक जिंकण्याची संधी; पाहा काय आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 6:36 PM

IPL 2021 च्या पार्श्वभूमीवर कंपनीनं आणली आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर. ही ऑफर २० सप्टेंबर ते १५ ऑक्टोपर्यंत राहणार वैध.

ठळक मुद्देIPL 2021 च्या पार्श्वभूमीवर कंपनीनं आणली आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर. ही ऑफर २० सप्टेंबर ते १५ ऑक्टोपर्यंत राहणार वैध.

भारतीयांचं क्रिकेटप्रती असलेलं प्रेम जगजाहीर आहे. रविवारपासून IPL २०२१ च्या उर्वरित सामन्यांना सुरूवात झाली. या पार्श्वभूमीवर व्होडाफोनआयडियानं (Vodafone-Idea) आपल्या ग्राहकांसाठी 'प्ले अलाँग'चं दुसऱं एडिशन लाँच केलं आहे. दरम्यान, कंपनी आपल्या ग्राहकांना २० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान अनेक जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी देत आहे. 

कंपनीनं विशेषत: आपल्या Vi App वर टी २० पाहा, खेळा आणि जिंका याची घोषणा केली आहे. Vi युझर्सना एकट्यानं किंवा आपल्या परिचयाच्या लोकांसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना २६ दिवस चालणाऱ्या ३० लाईव्ह मॅचेसमध्ये आकर्षक पुरस्कारही जिंकता येणार आहेत. युझर्सना यात बंपर प्राईजशिवाय दररोजही काही प्राईज जिंकण्याची संधी मिळणार आहे. व्होडाफोनआयडियानं या सामन्यांसाठी Disney+ Hotstar सोबत करार केला आहे. याद्वारे व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना IPL चे सामने पाहता येणार आहेत.

Vi ‘Play Along’ कॉन्सेप्टVi ‘Play Along’ हे प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यात Vi App च्या होमपेजपासून वन टाईम रजिस्ट्रेशन करावं लागतं. यासाठी त्या त्या दिवसाच्या निर्धारित मॅचच्या आधारे डेली चॅलेंजेस देण्यात येतात. यामध्ये मॅच कोण टॉस जिंकेल, कोणता संघ मॅच जिंकेल, पुढच्या ओवरमध्ये किती धावा होतील, अशा काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. दरम्यान, दररोज मॅच संपल्यानंतर विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात येईल. यामध्ये दररोज प्राईज म्हणून स्मार्टफोन, लॅपटॉप, आयपॅड, स्पोर्ट्स बाईक आणि दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेण्याचीही संधी मिळणार आहे.

टॅग्स :व्होडाफोनआयडियाइंटरनेटआयपीएल २०२१