Lokmat Money > बिझनेस न्यूज > VI ची घसरण सुरुच, नोव्हेंबरमध्ये गमावले १० लाख ग्राहक; Jioचं वर्चस्व कायम, Airtel चे ग्राहकही वाढले

VI ची घसरण सुरुच, नोव्हेंबरमध्ये गमावले १० लाख ग्राहक; Jioचं वर्चस्व कायम, Airtel चे ग्राहकही वाढले

दूरसंचार नियामक ट्रायनं २९ जानेवारी रोजी विविध टेलिकॉम कंपन्यांच्या युझर्ससंबंधित डेटा जारी केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:07 PM2024-01-30T13:07:45+5:302024-01-30T13:08:07+5:30

दूरसंचार नियामक ट्रायनं २९ जानेवारी रोजी विविध टेलिकॉम कंपन्यांच्या युझर्ससंबंधित डेटा जारी केला.

vodafone idea continues to loose customers loses 1 million customers in November reliance Jio s dominance continues Airtel s customers also increase trai data | VI ची घसरण सुरुच, नोव्हेंबरमध्ये गमावले १० लाख ग्राहक; Jioचं वर्चस्व कायम, Airtel चे ग्राहकही वाढले

VI ची घसरण सुरुच, नोव्हेंबरमध्ये गमावले १० लाख ग्राहक; Jioचं वर्चस्व कायम, Airtel चे ग्राहकही वाढले

दूरसंचार नियामक ट्रायनं (Telecom Regulatory Authority of India) २९ जानेवारी रोजी विविध टेलिकॉम कंपन्यांच्या युझर्ससंबंधित डेटा जारी केला. ताज्या अहवालानुसार, रिलायन्स जिओनं नोव्हेंबर २०२३ मध्ये ३४.५ लाख मोबाइल ग्राहकांना आपल्या सोबत जोडलं. तर Jio ची प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलनं (Bharti Airtel) सुमारे १७.५ लाख नवीन युझर्स जोडले आहेत. ट्रायच्या मंथली कस्टमर डेटानुसार, व्होडाफोन आयडियानं नोव्हेंबर २०२३ मध्ये १०.७ लाख ग्राहक गमावले. व्होडाफोन आयडियाच्या वायरलेस ग्राहकांची संख्या नोव्हेंबरमध्ये कमी होऊन आता केवळ २२.४४ कोटींवर आली आहे.

एअरटेलचा कस्टमर बेस वाढला
नोव्हेंबरपर्यंत, ३४.४७ लाख मोबाइल ग्राहकांची भर पडल्याने, रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या ४५.५८ कोटी झाली. देशातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा कंपनी जिओच्या ग्राहकांच्या संख्येत ऑक्टोबरमध्ये सुमारे ३१.६ लाखांनी वाढ झाली. १७.४७ लाख मोबाइल ग्राहकांना त्यांच्या ग्राहक बेसमध्ये जोडून, ​​भारती एअरटेलमधील युझर्सची संख्या ३७.९८ कोटी झाली.

व्होडाफोन आयडियाची स्थिती बिकट
त्याच वेळी, व्होडाफोन आयडियाचा युझर बेस सातत्यानं घसरत आहे. गेल्या वर्षी व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या कमी होत गेली. कंपनीनं सप्टेंबरमध्ये ७.५ लाख मोबाइल ग्राहक गमावले, ज्यामुळे त्यांच्या युझर्सची संख्या २२.७५ कोटींवर आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये कंपनीनं २०.४४ लाख ग्राहक गमावले. नोव्हेंबर २०२३ मध्ये १०.७ लाख ग्राहक गमावल्यानंतर, व्होडाफोन आयडियाच्या वायरलेस ग्राहकांची संख्या आता २२.४४ कोटींवर आली आहे.

Web Title: vodafone idea continues to loose customers loses 1 million customers in November reliance Jio s dominance continues Airtel s customers also increase trai data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.