Join us  

Vodafone-Idea : मोबाईल रिचार्जवर मोफत 5GB अधिक डेटा, ७ फेब्रुवारीपर्यंत मिळणार धमाकेदार ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 11:59 AM

Vodafone-Idea recharge offer : मोबाईल युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. मोबाईल रिचार्जवर तुम्हाला अतिरिक्त डेटा मोफत मिळेल.

Vodafone-Idea recharge offer : मोबाईल युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. मोबाईल रिचार्जवर तुम्हाला अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea (Vi) ने ही धमाकेदार प्रजासत्ताक दिन ऑफर आणली आहे. या डील अंतर्गत, कंपनी मोबाईल रिचार्जवर ग्राहकांना 5GB पर्यंत अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. ऑफरमध्ये मोफत डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या Vi ॲपवरून मोबाइल रिचार्ज करावा लागेल. या ऑफरची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीच्या काही स्वस्त प्लान्सबद्दल ज्यावर ही ऑफर दिली जात आहे.

299 रुपयांचा प्लॅनVoda चा हा प्लान 28 दिवस चालतो. यामध्ये कंपनी दररोज 1.5 जीबी डेटा देत आहे. ऑफर अंतर्गत तुम्हाला प्लॅनमध्ये 5 जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळेल. कंपनी या प्लॅनच्या ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये बिंज ऑल नाईट आणि विकेंड डेटा रोलओव्हर सोबत Vi Movies आणि TV अॅपचे विनामूल्य सदस्यत्व समाविष्ट आहे.

319 रुपयांचा प्लॅनकंपनीचा हा प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी रोजच्या इंटरनेट वापरासाठी 2 GB डेटा देत आहे. प्रजासत्ताक दिन ऑफर अंतर्गत, या प्लॅनमध्ये 5 जीबी अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. प्लॅनमध्ये Binge ऑल नाईट आणि विकेंड डेटा रोलओव्हरसह डेटा डिलाइट्स देखील देण्यात येत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळेल.

359 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 GB डेटा मिळेल. कंपनीच्या प्रजासत्ताक दिन ऑफर अंतर्गत, तुम्ही अॅपवरून रिचार्ज केल्यास तुम्हाला या प्लॅनसह 5 GB अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. यात अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS देण्यात येतात. यामध्ये कंपनी Binge All Night आणि विकेंड डेटा रोलओव्हरसारखे अतिरिक्त फायदे देखील देत आहे.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)