नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया कंपनीने एजीआरपोटी सोमवारी ३३५४ कोटी रुपयांचा दूरसंचार विभागाकडे भरणा केला. आम्ही आता सर्व मूळ रक्कम भरली आहे, असे या कंपनीतर्फे सांगण्यात आले.
व्होडाफोन-आयडिया यासह अन्य मोबाइल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या सुधारित याचिकांची सुनावणी मंगळवारी होणार असून, त्याआधी ही रक्कम भरण्यात आली आहे. व्होडाफोन आज ३३५४ कोटी रुपये भरल्यामुळे या कंपनीने दूरसंचार विभागाकडे जमा केलेली रक्कम आता ६८५४ कोटी रुपये इतकी झाली आहे.
या कंपनीने स्वत:हून एजीआरची रक्कम ठरवली होती, त्यानुसार पूर्ण मुद्दल रक्कम जमा झाल्याचा कंपनीचा दावा आहे. सर्वच मोबाइल
कंपन्यांनी एजीआरची ठरविलेली रक्कम आणि दूरसंचार मंत्रालयाने सांगितलेली रक्कम यात तफावत आहे.
अन्य मोबाइल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या सुधारित याचिकांची सुनावणी मंगळवारी होणार आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस व दूरसंचार मंत्रालय यांच्यातही रकमेबाबत वाद सुरू आहे.
५३ हजार कोटींचे येणे
व्होडाफोनने म्हटले आहे की, मूळ रक्कम व त्यावरील व्याज, दंड आणि दंडावरील व्याज अशी सारी रक्कम २१ हजार ५३३ कोटी रुपये होते. त्यापैकी मुद्दल रक्कम जी आहे, ती आम्ही जमा केली आहे. दूरसंचार मंत्रालयाला मात्र हा दावा मान्य नाही.
ंमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार व्होडाफोन-आयडिया यांच्याकडून एजीआरची रक्कम, व्याज, दंड व दंडावरील व्याज मिळून ५३ हजार कोटी रुपये येणे आहे.
त्यापैकी केवळ ६७५४
कोटी रुपयेच जमा झाले आहेत.
व्होडाफोन-आयडियाने जमा केले "३३५४ कोटी , आतापर्यंत एकूण भरले ६८५४ कोटी
व्होडाफोन-आयडिया यासह अन्य मोबाइल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या सुधारित याचिकांची सुनावणी मंगळवारी होणार असून, त्याआधी ही रक्कम भरण्यात आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:54 AM2020-03-17T05:54:06+5:302020-03-17T05:54:55+5:30