Vodafone Idea - व्होडाफोन-आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. व्हीआय आपल्या युजर्सला ३६५ रुपयांपासून सुरू होणाऱ्या आणि दररोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या सर्व प्लानमध्ये सुपरहिरो बेनिफिट्स देत आहे. याअंतर्गत व्हीआय युजर्स रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरू शकतात. आता व्हीआयनं आपल्या अॅन्युअल प्लानमध्ये आपल्या सुपरहिरो बेनिफिटचाही समावेश केला आहे, म्हणजेच व्हीआय युजर्सना आता फुल इयर प्लानमध्येही अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळणार आहे.
व्हीआयचा ३५९९ रुपयांचा प्लान
व्हीआयचा ३५९९ रुपयांचा प्लान हा व्हीआयचा वार्षिक प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा आणि संपूर्ण वर्षासाठी दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगचा ही फायदा मिळतो. आता व्हीआय युजर्स या प्लानमध्ये सुपरहिरो बेनिफिट म्हणजेच दररोज रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाचाही लाभ घेऊ शकतात. यासोबतच वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिपॉल्यूशन सारख्या फायद्यांचाही या प्लानमध्ये समावेश आहे.
व्हीआयचा ३६९९ रुपयांचा प्लान
व्हीआयचा ३६९९ रुपयांचा प्लान देखील व्हीआयचा अॅन्युअल प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सला ३६९९ रुपयांच्या प्लानचे सर्व बेनिफिट्स मिळतील, तसंच संपूर्ण १ वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लानमध्ये सुपरहिरो बेनिफिट्स, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स सारखे फायदे देखील समाविष्ट आहेत.
व्हीआयचा ३७९९ रुपयांचा प्लान
व्हीआयच्या ३७९९ रुपयांच्या प्लानमध्ये वार्षिक योजनेचे सर्व फायदे देखील समाविष्ट आहेत. या प्लानमध्ये युजर्सना अॅमेझॉन प्राईम लाइटचा फ्री अॅक्सेस मिळतो. यात सुपरहिरो बेनिफिट्स, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स सारख्या फायद्यांचाही समावेश आहे.