Join us  

Vodafone Idea चा हटके Plan! 299 रुपयांमध्ये दररोज 1.5GB डेटा आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:18 PM

Vodafone Idea : हा एक शॉर्ट-व्हॅलिडिटी प्लॅन आहे आणि खाजगी ऑपरेटरकडून प्रीपेड दर वाढीनंतर, युजर्ससाठी बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्यायांपैकी एक बनला आहे.

नवी दिल्ली : व्होडाफोनआयडियाचे (Vodafone Idea) असे अनेक लोकप्रिय प्लॅन आहेत, जे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा चांगले आहेत. व्होडाफोनआयडियाचा असा 299 रुपयांचा प्लॅन आहे, जो जिओच्या प्लॅनला मागे टाकतो. व्होडाफोन आयडिया आपल्या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा Vi Hero बेनिफिट्सह युजर्ससाठी 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. हा एक शॉर्ट-व्हॅलिडिटी प्लॅन आहे आणि खाजगी ऑपरेटरकडून प्रीपेड दर वाढीनंतर, युजर्ससाठी बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्यायांपैकी एक बनला आहे.

जिओ 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील ऑफर करते, परंतु नेहमीप्रमाणे ते त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा काहीतरी अतिरिक्त ऑफर करते. दरम्यान, येथे तुम्हाला हे माहित असले पाहिजे की अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनला जिओ ऑफर करत असलेल्या पेक्षा चांगला पर्याय बनू शकतो.

Vodafone Idea चा 299 रुपयांचा प्लॅनव्होडाफोन आयडिया (Vi) आपल्या 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅनला 28 दिवसांच्या लहान वैधतेसह ऑफर करते. या 28 दिवसांसाठी, युजर्संना दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवस मिळतात. याशिवाय युजर्संना Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights ऑफर मिळतात. यामध्ये Vi Movies आणि TV क्लासिक अॅक्सेससाठी अतिरिक्त ओव्हर-द-टॉप (OTT) सब्सक्रिप्शन देखील देण्यात आले आहे.

Jio चा 299 रुपयांचा प्लॅनयाउलट, जिओ आपला प्रीपेड प्लॅन तसाच समान वैधता, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस फायद्यांसह ऑफर करण्यात येत आहे. मात्र, जिओच्या प्लॅनमध्ये ऑफर केलेला डेटा 2GB प्रतिदिन आहे, जो युजर्संना व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटापेक्षा 500MB जास्त आहे.

Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन एअरटेल ग्राहकांना 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील ऑफर करते. या प्लॅनसह, युजर्संना 28 दिवसांची वैधता, अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Airtel Thanks फायदे मिळतात. हे व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनपेक्षा फारसे वेगळे नाही, परंतु युजर्ससाठी Vi Hero Unlimited बंडल करत असलेल्या बेनिफिट्ससह येत नाही. 

टॅग्स :व्होडाफोनआयडिया