व्होडाफोन आयडिया लिमिटेडनं एफपीओ (Vodafone Idea FPO) लॉन्च करण्याची घोषणा केलीये. कंपनी 18,000 कोटी रुपयांचा एफपीओ लॉन्च करणार आहे. हा एपीओ 18 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांच्या ऑफरला 16 एप्रिल रोजी मंजुरी दिली जाईल. व्होडाफोन आयडिनं (Vodafone Idea) त्यांच्या एफपीओसाठी (Follow-on Public Offer) प्राईज बँड निश्चित केला आहे. त्याची किंमत 10 ते 11 रुपये निश्चित करण्यात आली आहे. बोर्डानं रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, गुजरात सोबत रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल करण्यासाठी मंजुरी दिल्याचं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय.
किती करावी लागेल गुंतवणूक?
या एफपीओचा लॉट साइज 1298 शेअर्स आहे. अशा परिस्थितीत या एफपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 14,278 रुपयांची आवश्यकता असेल. रिपोर्टनुसार, कंपनी 15 एप्रिलपासून कंपनी रोड शो देखील सुरू करणार आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार आणि विश्लेषकांची भेट घेतली जाईल. हा रोड शो ऑफर बंद होईपर्यंत सुरू राहणार आहे. व्होडाफोन आयडियाच्या एफपीओला इक्विटीद्वारे 20,000 कोटी रुपये उभारण्यासाठी कंपनीच्या बोर्डाकडून 27 फेब्रुवारीला मंजुरी मिळाली होती.
काय असतो एफपीओ?
एफपीओमध्ये म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफरमध्ये जे पहिल्यापासूनच शेअर बाजारात लिस्ट आहेत, ते प्रमोटर्सना नवे शेअर्स जारी करते. कंपनी या नवीन शेअर्सद्वारे बाजारातून अतिरिक्त निधी उभारते. तर आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफर, हे त्या कंपन्यांचं येतं ज्या शेअर बाजारात लिस्टेड नाहीत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)