Lokmat Money > बिझनेस न्यूज > Vodafone Idea चा खास ४५ रुपयांचा प्लॅन, १८० दिवसांसाठी मिळते ‘ही’ सेवा

Vodafone Idea चा खास ४५ रुपयांचा प्लॅन, १८० दिवसांसाठी मिळते ‘ही’ सेवा

व्होडाफोन आयडियानं (Vi) अलीकडेच एक नवीन परवडणारा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. Vodafone Idea च्या या प्लॅनची किंमत फक्त 45 रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 08:48 PM2023-05-18T20:48:50+5:302023-05-18T20:49:13+5:30

व्होडाफोन आयडियानं (Vi) अलीकडेच एक नवीन परवडणारा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. Vodafone Idea च्या या प्लॅनची किंमत फक्त 45 रुपये आहे.

Vodafone Idea s special Rs 45 plan offers this service for 180 days missed call alert service no call data know details | Vodafone Idea चा खास ४५ रुपयांचा प्लॅन, १८० दिवसांसाठी मिळते ‘ही’ सेवा

Vodafone Idea चा खास ४५ रुपयांचा प्लॅन, १८० दिवसांसाठी मिळते ‘ही’ सेवा

व्होडाफोन आयडियानं (Vi) ने अलीकडेच एक नवीन परवडणारा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनची किंमत फक्त 45 रुपये आहे. या नवीन 45 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 180 दिवसांची आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सच्या इतर विद्यमान प्लॅनच्या तुलनेत या किमतीत इतकी वैधता देणारा प्लान तुम्हाला सापडणार नाही.

Vi ने मिस्ड कॉल अलर्ट प्लॅन फक्त 45 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा प्लॅन 180 दिवसांसाठी म्हणजे सुमारे 6 महिन्यांसाठी वैध असेल. हा मिस्ड कॉल अलर्ट प्लॅन आहे ज्यामध्ये यूजर्सना कॉलिंग आणि डेटाची सेवा मिळणार नाही. तुमचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असेल तेव्हा तुम्हाला कोणी कॉल केला आहे हे तुम्हाला समजेल. म्हणजेच, कॉलिंग आणि डेटासाठी तुम्हाला या प्लॅनसोबतच दुसरा प्लॅन चार्ज करावा लागेल.

5G सेवाच नाही

देशात 5G च्या शर्यतीत रिलायन्स जिओ आणि एअरटेल पुढे गेले आहेत. त्याच वेळी, Vodafone Idea ने अद्याप त्यांची 5G सेवा लाँच केलेली नाही. परंतु ती आपल्या 4G प्रीपेड प्लॅन्समध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन प्लॅन आणत आहे. ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी कंपनीनं नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यासोबतच मिस्ड कॉलसाठी स्वतंत्रपणे प्लॅन सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही कंपन्या आपल्या काही प्लॅन्ससोबत मिस्ड कॉल अलर्ट सेवा मोफतही देत आहेत

Web Title: Vodafone Idea s special Rs 45 plan offers this service for 180 days missed call alert service no call data know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.